शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

बोगस आधारकार्ड केंद्र उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2015 00:07 IST

कोणत्याही कागद पत्रांशिवाय ७५० रुपयांमध्ये आधार कार्ड काढून देणाऱ्या महिलेचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीने केला आहे

ठाणे : कोणत्याही कागद पत्रांशिवाय ७५० रुपयांमध्ये आधार कार्ड काढून देणाऱ्या महिलेचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीने केला आहे. तसेच त्या केंद्राची तोडफोड करून व तिला चोप देऊन तिला मंगळवारी पोलिसांच्या हवाली केले. वागळे इस्टेट परिसरातील ज्ञानेश्वर नगर येथे वनिता दुधे या महिलेने आधार केंद्र सुरु केले असून त्याठिकाणी बेकायदेशीररित्या आधार कार्ड काढून देत असल्याची माहिती मनसेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आधार कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे व किती पैसे भरावे लागतील. याची विचारणा केली असता, आधार केंद्र चालविणाऱ्या महिलेने कागद पत्रे असल्यास ३०० रुपये अन नसल्यास ७५० रु पये भरावे लागतील असे सांगितले. यावेळी मनसेच्या महिला शहराध्यक्षा रोहिणी निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनेसच्या शहर सचिव स्मिता साळवी, कोपरी महिला विभागप्रमुख समीक्षा मार्कंडे, सोना कुबल, प्रतिभा जाधव आदी महिला पदाधिकाऱ्यांनी त्या केंद्राची तोडफोड केली. तसेच त्या महिलेला चोप देऊन वागळे पोलिसांच्या हवाली केले.याप्रकरणी त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. तसेच ती याची कुठे नोंद करते. याचा शोध घेत असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी दिली. (प्रतिनिधी)