शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मतदार २ लाख ३२ हजार

By admin | Updated: July 11, 2015 03:41 IST

ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये तब्बल २ लाख ३२ हजार ५९१ मतदार बोगस असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या मतदारांचे पत्ते व इतर पुरावे

नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये तब्बल २ लाख ३२ हजार ५९१ मतदार बोगस असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या मतदारांचे पत्ते व इतर पुरावे सापडलेले नाहीत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ही नावे वगळण्यात येणार असून, सर्वच राजकीय पक्षांना हा धक्का असल्याचे मानले जात आहे. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्षांनी केला होता. वाशीतील एका प्रभागात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याची तक्रार काँगे्रस पदाधिकारी विजय वाळुंज यांनी केली होती. वाशी सेक्टर १७ मधील एकाच घरात ३० मतदारांचा पत्ता होता. नेरूळमध्ये एका राजकीय कार्यकर्त्याच्या विभागात त्यांच्या मूळ गावातील सर्व नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली होती. परंतु निवडणुकीच्या गोंधळामध्ये कोणतीही नावे वगळण्यात आली नाहीत. वाशीमध्ये उपमहापौर अविनाश लाड व इतर काही प्रभागामध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त होती. बोगस मतदार शोधून काढण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. दुबार नोंदी, मयत, स्थलांतरित मतदार वगळण्यात यावेत असे सूचित केले होते. महापालिकेने नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापूर मतदार संघातील मतदारांचे सर्वेक्षण केले. मतदार यादीतील नावाबरोबर आधारचा नंबर देण्यास सुरुवात केली. यामध्ये मोठ्याप्रमाणात बोगस नावे निदर्शनास आली. ऐरोली मतदार संघामध्ये तब्बल १ लाख १६ हजार १९७ व बेलापूर मतदार संघामध्ये १ लाख १६ हजार ३९४ नावे आढळून आली आहेत. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत माहितीसाठी ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)