शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:14 IST

अंत्यसंस्कार झाल्यानंतर मनपा प्रशासनाने संबंधित महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली असून, अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची चाचणी करण्यासाठी शोध सुरू केला आहे.

नवी मुंबई : तुर्भे येथील भरतशेठ क्वारी येथे ४३ वर्षांच्या महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिल्यानंतर तुर्भे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मनपा प्रशासनाने संबंधित महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे सांगितल्याने खळबळ उडाली असून, अंत्यसंस्कारासाठी उपस्थितांची चाचणी करण्यासाठी शोध सुरू केला आहे.दगडखाण परिसरात राहणाऱ्या महिलेला थकवा जाणवत असल्यामुळे तिला सोमवारी उपचारासाठी महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी साडेनऊ वाजता या महिलेचा मृत्यू झाला. रात्री साडेअकरा वाजता मृतदेह शवागृहामध्ये ठेवण्यात आला. बुधवारी रुग्णालयातील कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी मृतदेहावर तुर्भे स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ३०० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. गुरुवारी सकाळी महानगरपालिकेचे कर्मचारी मृत महिलेच्या घरी गेले व मृत महिलेला कोरोना झाला होता. यामुळे अंत्यसंस्कार प्रक्रियेला उपस्थित असणारांची कोरोना चाचणी करायची असल्याचे सांगितले. महानगरपालिका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीमुळे सर्वांना धक्का बसला आहे.कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास संबंधित मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात कसा दिला? मृतदेह देताना नियमांची अंमलबजावणी का करण्यात आली नाही? अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी जबाबदार असणारांची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नालंदा बुद्ध विहार संस्थेेचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी केली आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे घडले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.    - दीपक गायकवाड, सामाजिक     कार्यकर्ते

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या