शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या सीबीएसई शाळेची घंटा वाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:18 IST

महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे व नेरुळ येथे सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्यात आली आहे

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने कोपरखैरणे व नेरुळ येथे सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्यात आली आहे, अशा प्रकारचा शैक्षणिक उपक्रम राबवणारी नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम ठरली आहे. दोन्ही शाळांमध्ये सोमवारपासून पहिलीचे वर्ग सुरू होणार असून, पालकांच्या उत्तम प्रतिसादामुळे प्रतीक्षायादीही वाढत आहे.पालकांमध्ये सी.बी.एस.ई. शिक्षणाचे वाढते आकर्षण पाहता शहरातील खासगी शाळांमध्ये कमालीची वाढ होत आहे; परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आकारले जाणारे भरमसाठ शुल्क अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे पालिकेने सी.बी.एस.ई. शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती, त्यानुसार कोपरखैरणे सेक्टर ११ व नेरुळ सेक्टर ५० येथे सी.बी.एस.ई. शाळेचे पहिलीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचा शुभारंभ महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आयुक्त डॉ. रामास्वामी एन., उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे याच्या उपस्थितीमध्ये झाला. या प्रसंगी नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने पालिकेच्या वतीने सी.बी.एस.ई. बोर्डाची शाळा सुरू केल्याचे महापौर सुतार यांनी सांगितले.दोन्ही शाळांच्या इमारती मागील अनेक महिन्यांपासून विविध कारणांनी वादग्रस्त ठरत होत्या, यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर शाळा भरवण्याची मागणी होत होती. त्यानुसार आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी त्याकरिता सकारात्मक पाऊल उचलले होते. त्यानुसार गतमहिन्यात दोन्ही ठिकाणी सी.बी.एस.ई. शाळांचे वर्ग भरवण्याच्या अनुषंगाने शिक्षकभरतीची प्रक्रिया राबवली होती. शिवाय इच्छुक पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले होते, त्यानुसार कोपरखैरणेतील शाळेत ५० तर नेरुळच्या शाळेत २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. त्याशिवाय ५० हून अधिक विद्यार्थी प्रतीक्षायादीत आहेत. दोन्ही शाळांमध्ये सोमवारपासून पहिलीचे वर्ग भरण्यास सुरुवात होणार असल्याचे शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी सांगितले. सी.बी.एस.ई. शाळा सुरू करणारी नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम, तर देशात दुसरी ठरली आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पूर्णपणे अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षण दिले जाणार आहे, त्याशिवाय कम्प्युटर लॅबही सुरू केली जाणार आहे. पालिकेच्या इतर शाळांप्रमाणचे या सी.बी.एस.ई. शाळांमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण देणार आहे. विद्यार्थ्यांना अमर्यादित आहार पुरवला जाणार असल्याचेही संगवे यांनी सांगितले. नेरुळची शाळा आकांक्षा संस्थेमार्फत चालवली जाणार असून, दोन्ही शाळांवर पूर्णपणे पालिकेचे नियंत्रण राहणार आहे.