शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित अर्थसंकल्पावर टीकेची झोड; पनवेल महापालिकेच्या महासभेत अंतिम मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 05:13 IST

पनवेल महापालिका प्रशासनाने तयार केलेला सुमारे १२०० कोटींचा अर्थसंकल्प निधीअभावी ४३८ कोटींवर करण्यात आला आहे. नगरसेवकांसाठी असलेल्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पनवेल : पनवेल महापालिका प्रशासनाने तयार केलेला सुमारे १२०० कोटींचा अर्थसंकल्प निधीअभावी ४३८ कोटींवर करण्यात आला आहे. नगरसेवकांसाठी असलेल्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थसंकल्पाच्या अंतिम मंजुरीसाठी शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी हा अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडला.पीठासन अधिकारी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत व प्रभारी आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या उपस्थितीत विशेष सभेचे कामकाज जवळपास अर्धा तास उशिराने सुरू झाले. अर्थसंकल्पात नगरसेवकांकरिता केवळ पाच लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. सिडको नोडमधील नगरसेवकांना हा निधी सिडको विभागात वापरता येणार आहे की नाही? यासंदर्भात सभागृहात चर्चा करण्यात आली. नगरसेवक बबन मुकादम यांनी विकासकामे होत नसल्याने मतदारांचा रोष पत्करावा लागत असल्याचे मत व्यक्त केले. नगरसेवकांना सिडको नोडमध्येही हा निधी वापरता आला पाहिजे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. या वेळी प्रभारी आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी उत्तर देताना सांगितले की, नगरसेवकांनी हा निधी स्वच्छतेसाठी वापरणे गरजेचे आहे. याकरिता पालिका स्वच्छ प्रभाग ही स्पर्धा भरवणार आहे. स्पर्धेत प्रथम येणाºया प्रभागाला सन्मानित करण्यात येणार असल्याचे लेंगरेकर यांनी सांगितले. शेकाप नगरसेवक डॉ. सुरेखा मोहोकर यांनीही अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना आहार पुरविण्याकरिता केवळ एक लाखाची तरतूद असून सकस आहार पुरवण्यासाठी ही रक्कम वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.प्रशासनाने मांडलेल्या अर्थसंकल्पात ८०० कोटी वजा झाल्याने शासनाकडून निधी आणण्यास प्रशासन कुचकामी ठरत असल्याची टीका भाजपा आरपीआय गटाचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी केली. भाजपा नगरसेवक मुकीत काझी यांनी १२०० कोटींचा निधी ४०० कोटींवर येतोच कसा, यासंदर्भात सखोल चौकशीची मागणी सभागृहात केली. नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी पंचायत समितीकडे महापालिकेचा २१ कोटी ४५ लाख रुपये निधी बाकी आहे. हा निधी पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला वर्गही करण्यात आलेला आहे. त्याचा वापर जिल्हा परिषदेने सुरू केला असून हा निधी कधी महापालिकेकडे वर्ग होईल, असा प्रश्न प्रभारी आयुक्तांसमोर मांडला.शेकडो कोटींचा निधी वायाराज्य शासनाचे विविध अनुदान, तसेच विविध महामंडळांकडून येणारा निधी मिळाला नसल्याने १२०० कोटींचा अर्थसंकल्प ४०० कोटींवर आणावा लागला आहे. यामध्ये पालिकेला एलबीटीच्या रूपाने ५० कोटी मिळणार होते ते केवळ २० कोटी या अर्थसंकल्पात पकडण्यात आले आहेत.एमआरडीएमार्फत मिळणारे ६० कोटी ८० लाखापर्यंत पकडण्यात आले आहेत. शहरी विभाग नागरी दलित वस्ती सुधारणा १० कोटींवरून १ लाखापर्यंत मिळाल्याने अशाच प्रकारे इतर माध्यमातून येणारा निधी मिळाला नसल्याने सुधारित अर्थसंकल्प १२०० कोटींवरून थेट ४०० कोटींवर येऊन ठेपला.निधी नाही तरी विविध वास्तू उभारण्याची मागणीपनवेल महापालिकेचा फुगीर अर्थसंकल्प १२०० कोटींवरून थेट ४०० कोटींवर आल्याने विकासकामांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. विकासकामांकरिता पुरेसा निधी नसताना देखील नगरसेवकांनी विविध वास्तू उभारण्याची मागणी विशेष सभेत करण्यात येत होती.सुरु वातीला प्रशासनाने मांडलेला अर्थसंकल्प हा अंदाजित स्वरूपातील होता. एलबीटीसह विविध कराचा समावेश करण्यात आल्याने ती आकडेवारी फुगीर होती. मात्र, सुधारित अर्थसंकल्प केवळ महिनाभरासाठी असणार आहे. विविध विकासकामे या अर्थसंकल्पाच्या तरतुदीनुसार पूर्ण होतील अशी आशा आहे. फेब्रुवारीमध्ये पुन्हा नव्याने अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याने सर्व बाबीचा त्यामध्ये समावेश केला जाणार आहे- डॉ. कविता चौतमोल,महापौर, पनवेल महानगरपालिकासध्या पालिकेमार्फत कोणतीही विकासकामे करण्यात आलेली नाहीत. सुधारित अर्थसंकल्पातील निधीचा जास्तीत जास्त वापर ग्रामीण भागातील विकास कामाकरिता करणार आहोत. सिडको नोड हस्तांतरित झाल्यानंतर शहरी भागाचा विकास झपाट्याने करता येईल.- परेश ठाकूर,सभागृहनेते, पनवेल महानगरपालिकानगरसेवकांचा निधी पहिल्या महासभेला २५ लाख होता. तो निधी आता ५ लाख इतकाच करण्यात आला आहे. महापालिकेला सरकारकडून येणाºया निधीचा योग्य पाठपुरावा होणे गरजेचे आहे. याकरिता योग्य धोरण ठरविणे गरजेचे आहे.- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते

 

टॅग्स :panvelपनवेल