शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाई विरोधकांशी नव्हे, मित्रपक्षांबरोबर; भाजप कार्यशाळेतील सूर; ताकद वाढल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
भाडेवाढीनंतर महिनाभरात बेस्टचे ५ लाख प्रवासी घटले; महसूल मात्र ७४ कोटीने वाढला
4
२ राजयोगात रवि प्रदोष: सूर्यासारखे तेज मिळेल, भाग्य उजळेल; ‘असे’ करा व्रत, शिव होतील प्रसन्न
5
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
6
Housefull 5: पहिल्या दिवशीच हाऊसफुल कमाई! 'हाऊसफुल ५' सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
7
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
8
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
9
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
10
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
11
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
12
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
13
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
14
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
15
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
16
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
17
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
18
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
19
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
20
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा

निम्म्या शिधापत्रिका झाल्या बायोमेट्रिक

By admin | Updated: July 30, 2015 00:12 IST

शिधापत्रिका बायोमेट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या प्रत्येक विभागात शिधापत्रिकांच्या संगणकीकरणाची कार्यवाही सुरू आहे.

नवी मुंबई : शिधापत्रिका बायोमेट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या प्रत्येक विभागात शिधापत्रिकांच्या संगणकीकरणाची कार्यवाही सुरू आहे. नवी मुंबई विभागात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास ५० टक्के शिधापत्रिकाधारकांनी बायोमेट्रिकसाठी अर्ज सादर केले आहेत. पुढील १५ दिवसांत उर्वरित शिधापत्रिकांचेही अर्ज प्राप्त होतील, असा विश्वास शिधावाटप अधिकाऱ्यांनी केला आहे.नवी मुंबई विभागात घणसोली ते बेलापूर दरम्यान १ लाख ४० हजार ३४५ शिधापत्रिकाधारक आहेत. यात पिवळ्या, केशरी व पांढऱ्या रंगांच्या शिधापत्रिकांचा समावेश आहे. या सर्व शिधापत्रिका बायोमेट्रिक करण्याच्या दृष्टीने शिधावाटप कार्यालयाकडून जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. महिन्याभरात जवळपास ७६ हजार ५२८ शिधापत्रिकाधारकांनी अर्ज सादर केले आहे. उर्वरितांनी १५ आॅगस्ट २0१५ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिधावाटप अधिकारी संजय कोळी यांनी केले आहे. विभागातील शिधावाटप दुकानांत अर्ज उपलब्ध आहेत. अर्जासोबत शिधापत्रिकेची छायांकित प्रत, शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांच्या आधार कार्डाची छायांकित प्रत, बँक पासबुकची प्रत व अन्य कागदपत्रे सादर करायची आहेत. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधींना आवाहनशिधापत्रिकांच्या बायोमेट्रिकचे काम निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, या दृष्टीने वाशी शिधावाटप कार्यालयाकडून विविध स्तरांवर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनीही सहकार्य करावे, यासाठी त्यांना शिधावाटप कार्यालयांकडून निवेदन देण्यात आले आहे. यात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांचा समावेश आहे. संबंधितांनी शिधापत्रिकेच्या बायोमेट्रिकसंदर्भात आपापल्या क्षेत्रात जनजागृती करावी, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.