शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटर बसविण्यापूर्वी पाठविले बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 02:35 IST

खेरणे येथील एका वीज ग्राहकाला महावितरणकडून वीज मीटर बसण्यापूर्वीच एक हजार ५७0 रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे.

- मयूर तांबडे पनवेल : तालुक्यातील खेरणे येथील एका वीज ग्राहकाला महावितरणकडून वीज मीटर बसण्यापूर्वीच एक हजार ५७0 रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणचा भोंगळ कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.नावडे विभागातील खेरणे येथील जयदेव अनंत गोंधळी यांनी आपल्या नवीन घरासाठी वीज मीटर मिळवण्यासाठी मे-जून महिन्यात महावितरणकडे अर्ज केला होता. मात्र आजतागायत त्यांच्या घरी विजेचा मीटर बसलेला नाही. मात्र जयदेव गोंधळी यांना न बसलेल्या या मीटरचे चक्क एक हजार पाचशे सत्तर रु पयांचे बिल आल्यामुळे हे बिल कसे भरायचे असा प्रश्न गोंधळी यांना पडला आहे. या प्रकारामुळे महावितरणचा अजब कारभार समोर आला आहे. गोंधळी यांना १00 युनिटचे वीज बिल एक हजार ५७0 रु पये आलेले आहे. वीज मीटर बसलेले नसल्याने साहजिकच या वीज बिलावर मीटरचा फोटो छापण्यात आलेला नाही.जयदेव गोंधळी यांना महावितरणकडून ४ जून रोजी विजेचा पुरवठा करण्यात आले असल्याचे विद्युत बिलावर लिहिलेले आहे. तर २३ जुलै २0१८ रोजी गोंधळी यांच्या घरी बसवलेल्या विद्युत मीटरची रीडिंग नेण्यात आली असल्याचे देखील विजेच्या बिलावर लिहिलेले आहे. प्रत्यक्षात मात्र गोंधळी यांच्या घरी विजेचे मीटर बसविलेलेच नाही. तरी देखील गोंधळी यांना महावितरणकडून १ हजार पाचशे सत्तर रु पयांचे बिल पाठविण्यात आलेले आहे. त्यामुळे न बसवलेल्या विद्युत मीटरचे बिल कसे भरायचे असा प्रश्न जयदेव गोंधळी यांना पडला आहे. न बसलेल्या विद्युत मीटरचे बिल पाठवून महावितरणने ग्राहकांची थट्टाच उडवली आहे.>वीज मीटर बसलेले नसल्याने या ग्राहकाला आलेले वीज बिल भरावे लागणार नाही.- महेश सावंत, सहाय्यक अभियंता, नावडे विभाग, महावितरण