शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिद्रे हत्या प्रकरण : मृतदेहाच्या शोधासाठी ग्रॅडिओमीटर, प्रतिदिन दोन लाखांचा खर्च अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:56 IST

महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी, ग्रॅडिओमीटर उपकरणाची मदत पोलिसांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रतिदिन दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी, ग्रॅडिओमीटर उपकरणाची मदत पोलिसांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रतिदिन दोन लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे काही दिवसांपूर्वी तपासात समोर आले आहे. चौकशीत महेश पळशीकर याने हत्येची कबुली देत, बिद्रे यांचा मृतदेह तुकडे करून वसई खाडीत टाकल्याचे सांगितल्यावर, पोलिसांनी वसई खाडीत शोधमोहीम राबवली, परंतु दोन दिवस शोध घेऊनही हाती काहीच लागले नाही. अखेर मॅग्नोमीटर अथवा ग्रॅडिओमीटर उपकरणाच्या मदतीने खाडीमध्ये शोध घेण्याचा विचार पोलीस करत आहेत. ग्रॅडिओमीटर हे अधिक अद्ययावत असल्याने, खासगी कंपन्यांकडून खर्चाचे अंदाजपत्रक मागविले आहे. त्यापैकी नेरुळच्या फग्रो कंपनीने अंदाजपत्रक पोलिसांकडे सादर केल्याचे समजते. त्यानुसार, ग्रॅडिओमीटर उपकरणाद्वारे खाडीच्या पाण्यामध्ये शोधमोहीम राबविणार आहेत.हत्येनंतर बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे गोणीमध्ये भरून खाडीत टाकले. त्या गोणी पाण्यावर तरंगू नये, यासाठी गोणीमध्ये जड धातू ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे सुमारे १० मीटरच्या अंतरातच खाडीच्या तळाशी गोणीतील मृतदेह आढळण्याची शक्यता आहे. त्यानुसार, धातूचा शोध घेऊन मृतदेहाचे अंश मिळविण्याकरिता ग्रॅडिओमीटर वापरले जाणार आहे. त्यामधून मृतदेहाविषयीची माहिती हाती लागेल, असाही पोलिसांचा विश्वास आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई