शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेमध्ये वाढतोय अतिक्रमणाचा भस्मासुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 01:12 IST

कोपरखैरणेमधील माथाडी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू झाली आहेत.

- नामदेव मोरे नवी मुंबई : कोपरखैरणेमधील माथाडी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू झाली आहेत. कोणतीही परवानगी न घेता चार मजल्यांचे बांधकाम केले जात आहे. यामध्ये अनेक रॅकेट सक्रिय आहेत. तब्बल ३,९७३ पेक्षा जास्त बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र आहे. नियम धाब्यावर बसवून केलेल्या बांधकामांमुळे सार्वजनिक सुविधांवर ताण येऊ लागला आहे.कोपरखैरणे सेक्टर ६ मधील रूम नंबर ९१६ चे अनधिकृतपणे बांधकाम सुरू होेते. महापालिका प्रशासनाने शुक्रवारी येथील बांधकामावर कारवाई केली. वास्तविक या परिसरातील हे एकमेव बांधकाम नाही. मागील काही वर्षांमध्ये महापालिका प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींसह सर्वांनी केलेल्या दुर्लक्षामुळे व काही घटकांचे अभय असल्यामुळे माथाडी चाळींच्या जागेवर अतिक्रमणाचा भस्मासुर उभा राहिला आहे. बैठ्या चाळींच्या जागेवर दहा वर्षांपूर्वीच महापालिकेची परवानगी घेऊन तळमजला अधिक एक, असे बांधकाम करण्यास अधिकृत परवानगी देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात नियमाप्रमाणे बांधकाम सुरू झाले; परंतु बिल्डर व इतरांनी रहिवाशांना जादा बांधकाम करू देण्याचे आमिष दाखवून देण्यास सुरुवात केली, यामुळे एकच्या ऐवजी दोन व आता चार मजल्यांचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. अत्यंत कमी जागेमध्ये चार मजले उभे करण्यात आले आहेत. अनेक चाळींमध्ये ये-जा करण्यासही त्रास होऊ लागला आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून ही बांधकामे करण्यात आली आहेत. महापालिकेच्या विभाग कार्यालयानेही या बांधकामांच्या विरोधात कधीच ठोस भूमिका घेतली नाही. यामुळे सद्यस्थितीमध्ये संपूर्ण कोपरखैरणे परिसर बकाल झाला आहे.महापालिकेच्या नगररचना विभागातून मिळालेल्या माहितीप्रमाणे कोपरखैरणेमधील विविध सेक्टरमध्ये आतापर्यंत ५,०७४ जणांना बांधकाम करण्याची परवानगी दिली आहे. यामधील फक्त १,२०१ जणांनी नियमाप्रमाणे बांधकाम केले असून, भोगवटा प्रमाणपत्र घेतले आहे. तब्बल ३,८७३ जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतलेले नाही. नियमाप्रमाणे बांधकाम केले नसल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र घेण्यात आले नाही. अतिक्रमण केले असल्यामुळे बांधकामधारक भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्जही दाखल करत नाहीत. सद्यस्थितीमध्ये नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येत नाही; परंतु यानंतरही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अतिक्रमणाचे गंभीर परिणाम या परिसरातील रहिवाशांवर होऊ लागले आहेत. रस्ते अरुंद झाले असून, वारंवार वाहतूककोंडी होत आहे. मलनि:सारण वाहिन्यांमधून पाण्याचा योग्यपद्धतीने निचरा होत नाही. पाणीपुरवठा यंत्रणेवर परिणाम होऊ लागला आहे. वाहने उभी करण्यासाठी नागरिकांना जागाही उपलब्ध नाही.।पालिका अधिकारीही जबाबदारंकोपरखैरणेमधील अनधिकृत बांधकामांना महापालिकेचे अधिकारी व कर्मचारीही जबाबदार आहेत. जवळपास चार हजार अनधिकृत बांधकामे पूर्ण होईपर्यंत प्रशासनाने कधीच कडक कारवाई केली नाही. अप्रत्यक्षपणे अतिक्रमणांना अभय मिळेल, अशीच भूमिका घेतली. यामुळे यास जबाबदार असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.।बिल्डरवरही कारवाई करावीकोपरखैरणेमध्ये अनधिकृत बांधकाम करणाºयांवर काही गुन्हेही दाखल केले आहेत. वास्तविक बांधकाम करणारे ठेकेदार व बिल्डरांचीही यामध्ये महत्त्वाची भूमिका असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आराखडे तयार करणाºया वास्तुविशारदांची भूमिका तपासण्याचीही आवश्यकता असून, या रॅकेटमध्ये कोणी सहभागी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.।कठोर उपाययोजनांची गरजअतिक्रमणांमुळे कोपरखैरणे परिसराला समस्यांचा विळखा पडला आहे. बैठ्या चाळींच्या जागेवर चार मजल्यांच्या चिंचोळ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. या सर्वांचा परिसरातील सार्वजनिक सुविधांवर ताण पडत आहे. मोटार लावल्याशिवाय चौथ्या मजल्यापर्यंत पाणी जात नाही, अनधिकृतपणे मोटारचा वापर केला जात आहे. रस्ते अपुरे पडत आहेत. रोडवरून चालणेही मुश्कील झाले आहे. बांधकामाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले असून भविष्यात परिस्थिती अजून गंभीर होणार आहे.।सेक्टरनिहाय बांधकाम परवानगीचा तपशीलसेक्टर बांधकाम भोगवटा परवानगी प्रमाणपत्र१ ११३ १००२ ५३८ ८४३ ३९२ ४५४ ६०५ ७७१० २१ १४११ ९५ ८२१२ ११० ८०१३ ०६ ०३१४ ९९ ७८१५ ५८७ ८११६ ५२८ ८६१७ ५४५ ८५१८ ६०४ ६०१९ २५६ २०३२० ४१ ३४२२ १० ०१२३ १६ ०३२५ ०१ ०१२६ ०१ ०१२७ ०२ ०१