शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भंगारमाफियांचा गोरेगावात हैदोस

By admin | Updated: March 31, 2017 06:16 IST

गोरेगाव, लोणेरे शहरात अनधिकृत कारवायांना मागील अनेक दिवसांपासून ऊत आला आहे. मूळचे बांगलादेशी नागरिक

माणगाव : गोरेगाव, लोणेरे शहरात अनधिकृत कारवायांना मागील अनेक दिवसांपासून ऊत आला आहे. मूळचे बांगलादेशी नागरिक स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून बेकायदा अनेक प्रकारचे धंदे करीत आहेत. भंगाराच्या नावाखाली वेगवेगळे धंदे सुरू आहेत. ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही. भंगार व्यवसायासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही परवानगी आवश्यक असते. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत कोणत्याही परवानग्या तपासत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या शेडसाठी कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क न भरता, भराव करत आहेत. हा भराव करताना पारंपरिक मोठा नाला (कलवनी) बुजविण्याचा प्रयत्न केल्याने पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे.गोरेगाव व लोणेरे शहरामध्ये अनेक भंगारमाफियांनी बस्तान मांडले आहे. भंगार खरेदी-विक्र ीच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावामुळे गोरेगाव पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करून तपासणी करीत नाही, अथवा बेकायदा चालू असलेल्या भंगार अड्ड्यावर कोणतीही कारवाई करीत नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामध्येही स्थानिक पुढाऱ्यांनी मध्यस्ती केल्यामुळे त्यावर होणारी कारवाई टळली असली, तरी चरस-गांजाची विक्र ी मात्र थांबलेली नाही. हे मादक पदार्थ याच माफियांच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचा स्थानिकांना संशय आहे.गोरेगावमधील बीएसएनएल टॉवर शेजारी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत अनधिकृत कोणतीही परवानगी न घेता भली मोठी शेड उभी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीत चौकशी केली असता, ग्रामपंचायतीने यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर) गोरेगाव ग्रामपंचायतीकडून आजतागायत भंगार व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत क्षेत्रात कोणताही व्यवसाय सुरू करताना ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. नाला बुजविण्याबाबत ग्रामपंचायतीकडून तत्काळ नोटीस बजावण्यात येत आहे.- गणेश खातू, ग्रामविकास अधिकारी