शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गाढेश्वर धरणावर पोलिसांचा चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 02:02 IST

दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे पर्यटकांचा गाढेश्वर व खारघर येथील पांडवकडा धबधब्याकडे ओढा वाढला आहे

मयूर तांबडेपनवेल : दोन दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे पर्यटकांचा गाढेश्वर व खारघर येथील पांडवकडा धबधब्याकडे ओढा वाढला आहे. रविवारी सुट्टीचा दिवस आणि त्यात सकाळपासून कोसळणाºया पावसामुळे अनेक पर्यटकांनी या धबधब्यांकडे आपला मोर्चा वळविला. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना धरणावर मज्जाव केल्याने अनेकांचा हिरमोड झाला. गाढेश्वर धरणावर तर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोेलिसांनी अनेक पर्यटकांची वाहने रस्त्यातूनच परत पाठविली. त्यामुळे मुंबई, ठाणे व रायगडमधून आलेल्या शेकडो पर्यटकांची मोठी निराशा झाली.पनवेल तालुक्यातील गाढेश्वर (देहरंग) धरण परिसरात पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात मौज करण्यासाठी शनिवार आणि रविवारच्या दिवशी हजारो पर्यटक येतात. अति उत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात. अनेकदा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात घडतात. अशा अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. दरवर्षी पावसाळ्यात होणाºया अशा अपघातांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने पोलिसांनी यावर्षी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या गाढेश्वर धरणावर कडा पहारा ठेवण्यात आला आहे. धरणाकडे जाणाºया तरुणाईला रस्त्यातच अडवून त्यांना परत पाठविले जात आहे. विशेष म्हणजे हौशी पर्यटकांना अटकाव करण्यासाठी पोलिसांचे फिरते पथकही तैनात करण्यात आले आहे. धरणाच्या दिशेने जाण्यास प्रतिबंध घातला जात असल्याने अनेकांनी रिक्षा व एसटी या प्रवासी वाहनांचा आधार घेत धरण गाठल्याचे दिसून आले.तालुका पोलिसांनी येथील वाजे गावाजवळ बॅरीगेट्स लावले आहेत. मद्यपींना धरणाच्या परिसरात देखील फिरकू दिले जात नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांनी धरण परिसरात जाऊ नये, असे आवाहन केले जात आहे. पर्यटकांनी पाण्यात उतरू नये व स्वत:चा जीव धोक्यात घालू नये असा संदेशही पोलिसांकडून देण्यातयेत आहे.