शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसडक योजनेला निकषांचा बे्रक

By admin | Updated: April 4, 2016 02:05 IST

ग्रामीण विभागातील दुर्गम भागाच्या रस्त्यांच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील गुणांकाचे काही निकष हे जाचक आहेत.

आविष्कार देसाई,  अलिबागग्रामीण विभागातील दुर्गम भागाच्या रस्त्यांच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील गुणांकाचे काही निकष हे जाचक आहेत. येत्या चार वर्षांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे २०० किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेतून निर्माण करायचे आहेत. परंतु दुर्गम भागांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा मुळ हेतू जाचक अटींमुळे सफल होणार नसल्याचे दिसून येते.पंतप्रधान ग्राम सडक योजनेप्रमाणेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी म्हणतील त्याप्रमाणे रस्ते तयार होणार नाहीत. तर आवश्यक असणाऱ्या मार्गांचा या योजनेतून विकास साधण्याचा सरकारचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.मुंबईपासून अगदी जवळचा असणारा जिल्हा अशी रायगड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र या रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी रस्त्यांची निर्मिती अद्याप झालेली नाही. पूर्वी लोकप्रतिनिधी त्यांना आवश्यक असलेल्या भागांमध्येच रस्त्यांची निर्मिती आणि दुरुस्ती करायेच. त्यामुळे मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या भागाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये गुणांक पध्दत अवलंबिली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने त्या मार्गावरून एसटी बस जाते की नाही हा निकष अतिशय जाचक आहे. जिल्ह्यातील काही अशी ठिकाण आहेत की, तेथे रस्ताच नाही म्हणून एसटी बस जात नाही आणि एसटी बस येत नाही म्हणून तेथे रस्ता नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे असा निकष येथे अडचणीचा ठरणार आहे.पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निकष बदलण्याची विनंती केली आहे. त्याचप्रमाणे प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधीही मांडली असल्याचे भाजपाचे उपाध्यक्ष सतीश धारप यांनी सांगितले.२०१५-१६ साठी ३३ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २०१६-१७ या वर्षात सुमारे ७६ कोटी रुपये खर्चाचे ७३ किलोमीटरचे रस्ते होणार आहेत. मात्र नियोजन समितीला २३ कोटी रुपयेच मंजूर केले आहेत. पुढील चार वर्षांत सुमारे २०० किलोमीटर लांबीचे रस्ते जिल्ह्यात होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागाला होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.