शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना झुकते माप

By admin | Updated: March 29, 2017 05:56 IST

महापालिकेमध्ये एक वर्षापासून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना झुकते माप देण्यात आले आहे. अनेक अधिकाऱ्यांचे काम

नामदेव मोरे / नवी मुंबई महापालिकेमध्ये एक वर्षापासून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना झुकते माप देण्यात आले आहे. अनेक अधिकाऱ्यांचे काम समाधानकारक नसतानाही त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. दुसरीकडे पालिकेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली व अनेकांवर निष्काळजीपणासह इतर ठपके ठेवून कारवाईही करण्यात आली. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर ग्रामपंचायतीमधील शिपाई व लेखनिकांचाही पालिकेत समावेश झाला. नियमाप्रमाणे यातील अनेकांना पदोन्नती मिळत गेली व विभाग अधिकारी ते उपआयुक्तपदापर्यंतची पदेही या अधिकाऱ्यांनी भूषविली. आतापर्यंत आलेल्या आयुक्तांनी प्रतिनियुक्तीसह येथे पूर्वीपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधून महापालिकेचा कारभार उत्तमपणे चालविला. परंतु मागील एक वर्षापासून प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना झुकते माप देण्यास सुरवात झाली व येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाले. जवळपास १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जगन्नाथ सिन्नरकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी या त्रासाला कंटाळून राजीनामा देणे पसंत केले. ग्रामपंचायतीमधून पालिकेत आलेल्या सुरेश पाटील यांच्यासारखा सर्वांशी योग्य संवाद ठेवून काम करणारा अधिकारी निवृत्त झाला, परंतु निवृत्तीनिमित्त त्यांना साधा बुकेही देण्यात आला नाही. पालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाले, पण ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली त्यापैकी एकही अधिकारी प्रतिनियुक्तीवर आलेला नाही. यामुळे येथील अधिकारी चुकीचे काम करत असून प्रतिनियुक्तीवर आलेले सर्व जण उत्तम कार्य करतात का, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला होता. घणसोलीमधील विभाग अधिकारी दिवाकर समेळ यांना किरकोळ कारणांसाठी निलंबित करण्यात आले. अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त कैलास गायकवाड यांनाही आयुक्तांच्या बदलीच्या काही दिवस अगोदर मूळ संवर्गात पाठविण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे शासनाकडून आलेले अधिकारी व पालिकेतील अधिकारी यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, विद्यमान आयुक्त एन.रामास्वामी यांना ही दरी मिटवून पालिकेचा कारभार चालविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. सुहास शिंदेंचा मुक्काम  ३ वर्षे ८ महिने शासनाने महापालिकेत पाठविलेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुख्य लेखा परीक्षक सुहास शिंदे हे सर्वाधिक काळ नवी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. १७ आॅक्टोबर २०१३ रोजी त्यांची नियुक्ती झाली तेव्हापासून सलग ३ वर्षे ८ महिने झाले तरी त्यांची अद्याप बदली झालेली नाही. लेखा परीक्षक हे अत्यंत महत्त्वाचे पद त्यांच्याकडे असले तरी ते त्या पदावर फारसे रमलेच नाहीत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावरही ते अनेक दिवस कार्यरत होते. तेव्हा बिले देणे व तपासणे ही दोन्ही कामे एकाच अधिकाऱ्याकडे असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात त्यांची नियुक्ती चक्क प्रशासन उपआयुक्तपदावर करण्यात आली. लेखा परीक्षक म्हणून त्यांनी फारसा प्रभाव पाडला नाहीच शिवाय आयुक्त आले की त्यांच्या पुढे - पुढे करण्यात ते हजर असतात अशी टीका पालिकेत सुरू आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला तेव्हाही ते पुढे दिसलेच शिवाय विद्यमान आयुक्त एन. रामास्वामी आल्यानंतर कारमधून उतरताना हस्तांदोलनासाठी सर्वात पुढे गेले ते सुहास शिंदेच. त्यांचे पुढे - पुढे करणे अनेकांना खटकले. शासनाकडून महापालिकेत आलेल्या अधिकाऱ्यांचा तपशील नावपदअंकुश चव्हाण  अतिरिक्त आयुक्तरमेश चव्हाण  अतिरिक्त आयुक्ततृप्ती सांडभोर  उपआयुक्तउमेश वाघ  उपआयुक्ततुषार पवार  उपआयुक्तमोमीन एजाज  संचालक नगररचनास. पं. उगिले  नगररचनाकारडॉ. सुहास शिंदे  मुख्य लेखा परीक्षकधनराज गरड  मुख्य लेखा व वित्त अधिकारीसंदीप संगवे  शिक्षणाधिकारीअंगाई साळुंखे  सहायक आयुक्तज्योती धोत्रे  सहायक आयुक्ततुषार बाबर  सहायक आयुक्त