शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात नोकर भरती करणे बंद करा, आता हे चालणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांचा गुगल, मायक्रोसॉफ्टसह अमेरिकी कंपन्यांना इशारा
2
"इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका"; अजितदादांनी माणिकराव कोकाटेंना दिला होता इशारा
3
'कलाकेंद्रातील महिला गोळीच्या आवाजाने बेशुद्ध'; दौंड गोळीबारप्रकरणी आरोपींवर मकोका लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना
4
पाकिस्तानी पासपोर्टचा नंबर शेवटून चौथ्या नंबरवर; भारतासाठी आनंदाची बातमी
5
IND vs ENG : पंतच्या जागी इशान किशनला मिळू शकते संधी; या कारणांमुळे तो ठरतो प्रबळ दावेदार
6
“स्वागत, अभिनंदन करतो”; मोहन भागवत-मुस्लीम धर्मगुरू बैठकीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; उच्चांकी स्तरावरुन मोठ्या प्रमाणात घसरले दर, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत
8
धक्कादायक! पत्नीने पतीची जीभ तोडून खाल्ली; रक्तही प्यायली, ऐकून पोलिसही चक्रावले...
9
सोळा सोमवारचे व्रत कठीण पण तेवढेच फलदायी, कधी करावी सुरुवात? वाचा व्रतविधी!
10
रात्रीच्या अंधारात विवाहित प्रेयसीला भेटायला आला प्रियकर, नेहमीच्या ठिकाणी पोचला अन् पाहतो तर...
11
'दिलबर जानी'चा कारनामा! १९ वर्षाचा तरुण महिला, तरुणींचे बनवायचा व्हिडीओ; 'बंगळुरू नाईट लाईफ'च्या नावाखाली...
12
IND vs ENG: दुष्काळात तेरावा महिना! दुखापतीमुळे ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, Good News! ८वा वेतन आयोग कधी येणार? पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर!
14
Smriti Irani : फाटलेला टी-शर्ट अन् साइड रोल...; ज्योतिषाच्या 'त्या' भविष्याणीमुळे बदललं स्मृती इराणीचं आयुष्य
15
Post Office च्या MIS स्कीममध्ये २ लाख जमा केल्यास महिन्याला किती मिळेल व्याज; पटापट चेक करा
16
"हर्षल पाटीलला आम्ही काम दिलं नव्हतं, त्याने..."; कंत्राटदाराच्या मृत्यूवर अजित पवारांचे स्पष्टीकरण
17
गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द
18
बँकांकडून १२ लाख कोटींचे कर्ज बुडीत, कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी
19
मराठमोळा धमाका! आयुष म्हात्रेने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; ९ षटकार खेचत रचला मोठा विक्रम
20
संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प कधी होणार? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तारीखच सांगितली

‘आदर्श गाव’साठी बेलवडेची निवड

By admin | Updated: October 1, 2015 01:56 IST

तालुक्यातील बेलवडे गावाची निवड राज्याच्या आदर्श गाव योजनेत झाल्याचे आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष व हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव पवार यांनी बुधवारी सकाळी बेलवडे गावकऱ्यांच्या

पेण : तालुक्यातील बेलवडे गावाची निवड राज्याच्या आदर्श गाव योजनेत झाल्याचे आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष व हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव पवार यांनी बुधवारी सकाळी बेलवडे गावकऱ्यांच्या घेतलेल्या ग्रामसभेत जाहीर केले.पोपटराव पवारांनी यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधला. आदर्श गाव योजनेची सर्व निकषांची पूर्तता झाल्याने गावच्या शिवारातील उपजत संसाधनावर श्रमदान व शासकीय आर्थिक पाठबळाच्या आधारे गावाची उन्नतीच्या दिशेने प्रगतीचे पाऊल टाकण्यास गाव सज्ज झाले आहे. याची खात्री पटल्यावर गावकऱ्यांच्या सांघिक एकता व श्रमशक्तीच्या पाठबळावर पोपटराव पवार यांनी ग्रामसभेत आदर्श गाव योजनेत बेलवडे गावाची निवड जाहीर करून गावकऱ्यांना सुखद धक्का दिला. बेलवडे ग्रामसभेत आदर्श गाव निवड कार्यक्रमाची ग्रामसभा नियोजित वेळेनुसार सुरू झाली. बेलवडे गावाची विकासात्मक कामाची रुपरेषा महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष मनोज गावंड यांच्याकडे सुपूर्द केली असून या संस्थेचे सर्व कर्मचारी येत्या एप्रिल २०१६ पर्यंत गावाच्या शिवारातील विकासकामांची रुपरेषा आराखडा बनवतील. ११ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्राला १ कोटी १० हजारांचा विकासनिधी व ग्रामस्थांचे श्रमदान यावर आधारित या गावच्या शिवारात जलयुक्त शिवार, पाण्याचे नियोजन, कृषीतंत्रज्ञानावर आधारित पिके, योजनेची सात सूत्रे, परस्पर सहकार्य भावना, जंगलाचे संवर्धन, इंटरनेट प्रणाली या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गाव आदर्श बनवायचे आहे. याबाबतीत सखोल मार्गदर्शन पोपटराव पवारांनीकेले.हनुमान मंदिराच्या सभामंडपात झालेल्या या ग्रामसभेत व्यासपीठावर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, योजनेचे उपसंचालक, बी. आर. कराळे, अधीक्षक कृषी अधिकारी तरकसे, सुरेशचंद्र वारगडे, उपविभागीय कृषी अधिकारी ढवळे आदींसह शासकीय अधिकारी व कर्मचारीवर्गाशिवाय आदर्श गाव योजनेचे बेलवडे गावाचे पदाधिकारी कृष्णा पाटील, उपसभापती पेण हरेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष हरेश पाटील, परशुराम पाटील आदी सदस्य उपस्थित होते.(वार्ताहर)