शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिल्पांच्या परिसराचे सुशोभीकरण!

By admin | Updated: November 17, 2016 05:40 IST

खारघर शहराचे प्रवेशद्वार म्हणून हिरानंदानी उड्डाणपूल परिसर ओळखला जातो.

वैभव गायकर

पनवेल : खारघर शहराचे प्रवेशद्वार म्हणून हिरानंदानी उड्डाणपूल परिसर ओळखला जातो. सिडकोने शहराचा विकास अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केला आहे. यानुसार सिडको कार्यालयाच्या मागील बाजूस शहराच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेले हे शिल्प हस्तकलेचा सुंदर असा नमुना होते. मात्र, या शिल्पाजवळूनच स्कायवॉक प्रकल्प गेल्याने हे शिल्प एका बाजूला पडले असून दिसेनासे झाले आहे. मात्र, सिडकोने या परिसराचा विकास करण्याचे ठरविले असून ही शिल्पअसलेल्या परिसरात उद्यान विकसित केले जाणार आहे. यामुळे पुन्हा एकदा या शिल्पांना नवसंजीवनी देण्याचे काम केले जाणार आहे. सध्याच्या सिडकोच्या विभागीय कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या भूखंड क्र मांक २२, २३ वर ही शिल्पे आहेत. या शिल्पांना आणखीनच उठावदार दिसण्यासाठी या भूखंडाचा सर्वांगीण विकास सिडको करणार आहे. पाच हजार स्केअर मीटरचा असा हा भूखंड असून या ठिकाणी चिल्ड्रन प्ले एरिया, लॉन, गझेबो (बसण्यासाठी शेड), वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे रोपण आदींसह विविध मनोरंजनात्मक साहित्य या ठिकाणी बसविले जाणार आहे. याकरिता तीन महिन्यांपूर्वीच एका खासगी कंपनीला हे टेंडर देण्यात आले आहे. याकरिता सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले आहे. खारघर शहरामध्ये गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क यासह महत्त्वाकांक्षी प्रकल्प उत्सव चौक, शिल्प चौक अशाप्रकारच्या कलाकृती उभारल्या आहेत. त्यापैकीच हे शिल्प एक असून त्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. या शिल्पांच्या परिसराला विकसित करून शिल्पही याच ठिकाणी दर्शनीय भागात स्थलांतरित करण्याचा आमचा विचार असल्याचे खारघरमधील सिडकोचे प्रशासक प्रदीप डहाके यांनी सांगितले. या ठिकाणी बांबूसारख्या विविध शोभेच्या झाडाचे रोपण करून आम्ही परिसर आणखीनच सुंदर करणार आहोत. येणाऱ्या नागरिकांनाही या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करणार आहोत त्यामुळे ही कलाकृती जवळून पाहता येणार असल्याचे डहाके यांनी सांगितले.