शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईच्या पॉकेटमनीतून दिला वंचितांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2016 02:24 IST

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील तरुणांनी कॉलेजला जाताना आई - वडिलांकडून मिळणाऱ्या पॉकेटमनीचा समाजसेवेसाठी उपयोग करण्याचा निर्धार केला आहे.

नवी मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील तरुणांनी कॉलेजला जाताना आई - वडिलांकडून मिळणाऱ्या पॉकेटमनीचा समाजसेवेसाठी उपयोग करण्याचा निर्धार केला आहे. हेल्पिंग हँड ग्रुपच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थी, अनाथ मुलांसह वंचितांना धान्य व इतर वस्तू उपलब्ध करून देत आहेत. या तरुणांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणारे तरुण पालकांकडून रोज पॉकेटमनी घेत असतात. या पैशातून हॉटेलमध्ये पार्टी, ट्रीप व इतर गोष्टींवर खर्च केला जातो. १८ वर्षे पूर्ण न झालेले तरुणही धूमस्टाईल मोटारसायकल चालवत असतानाचे चित्र प्रत्येक महाविद्यालयाच्या परिसरात दिसते. पॉकेटमनीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे वास्तव असताना मुंबई, नवी मुुंबई , ठाणे, कल्याण परिसरातील तरुणांनी वाचविलेल्या पैशातून समाजसेवा सुरू केली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागणाऱ्या मुलांचे दु:ख न पहावल्याने या विद्यार्थ्यांनी हेल्पिंग हँड ग्रुप तयार केला. पालकांनी दिलेले पैसे वाचवून या मुलांना खाऊ व इतर खाद्यपदार्थ देण्यास सुरवात कली. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून यामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या वाढू लागली आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम व आदिवासींसाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आहेत. परंतु यानंतरही प्रत्येक वंचितापर्यंत मदत पोहचत नाही. ज्यांना कोणाचीही मदत मिळत नाही अशा गरजूंना मदत पोहचविण्यासाठी हे तरुण प्रयत्न करत आहेत. रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी असणाऱ्या अनाथ मुलांपासून सुरू केलेल्या या कामाची व्याप्ती वाढू लागली आहे. हेल्पिंग हँडची टीम सुटी मिळाली की आदिवासी गावांमध्ये जावून तेथील मुलांना खेळ, गाणी शिकविण्याचे काम करत आहे. या मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ देते. नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या बहाण्याने सर्वत्र जल्लोष केला जातो. या पार्ट्यांमुळे तरुणांना दारूचे व्यसन लागत असून अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते. नववर्षाचे स्वागत विधायक कामाने साजरे करण्यासाठी या सर्वांनी मारीया या अनाथ संस्थेला भेट दिली. दिवसभर या मुलांना विविध खेळ व गाणीही शिकविण्यात आली. वाढदिवसानिमित्त मित्रांना पार्टी देण्यापेक्षा वृद्धाश्रमात जावून तेथील आजी - आजोबांच्या सोबत वाढदिवस साजरा केला जात आहे. तरुणांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)