शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड वापरणारे रॅकेट उघडकीस

By admin | Updated: April 13, 2017 02:56 IST

टाटा डोकोमो कंपनीचे सिमकार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे कार्यान्वित करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ११२० सिमकार्ड व बनावट

नवी मुंबई : टाटा डोकोमो कंपनीचे सिमकार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे कार्यान्वित करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ११२० सिमकार्ड व बनावट कागदपत्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. विजय हरिप्रसाद यादव व सतीश हरिश्चंद्र गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. टाटा डोकोमो मोबाइल कंपनीने सिमकार्ड विक्रीचे दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी खांदा कॉलनी पनवेल येथील व्ही. जे. मोबाइल शॉपमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड अ‍ॅक्टिव्हेट केलेल्या मोबाइल नंबरची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रमोद पाटील यांना मिळाली होती. ते मोबाइल क्रमांक अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कागदपत्रांसह कॅप फॉर्म टाटा डोकोमो कंपनीकडून प्राप्त केले असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त दिलीप सावंत, सहायक पोलीस आयुक्त नितीन कौसाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या पथकाने नवीन पनवेल सेक्टर ७ मधील दुकानावर छापा मारला. कंपनीमध्ये व्ही. जे. मोबाइल शॉपमध्ये टाटा डोकोमो कंपनीचे सुमारे ११२० सिमकार्ड, ते अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी वापरण्यात येणारे ८ मोबाइल फोन, वेगवेगळ्या मोबाइल दुकानांच्या नावाचे १६ रबरी स्टँप व प्रीपे कस्टमर अ‍ॅप्लिकेशन फॉर्म १३ मिळून आले आहेत. या प्रकरणी विजय यादवला अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी केली असताना कंपनीने प्रत्येक महिन्याला २१०० सिमकार्ड विक्रीचे दिलेले टार्गेट पूर्ण न केल्यास कमिशन मिळत नाही. नमूद टार्गेट पूर्ण केल्यास कंपनीकडून जास्त प्रमाणात कमिशन मिळून त्यास आर्थिक फायदा होतो. कंपनीकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळविण्याकरिता बनावट आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र व रबरी शिक्क्यांचा वापर करून सिमकार्ड अ‍ॅक्टिव्हेट केले असल्याचे सांगितले. या गुन्ह्याचा तपास करण्यामध्ये युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, बबन जगताप, सुभाष पुजारी, किरण भोसले, अनिल पाटील, सुनील साळुंखे, विजय आयरे, राकेश मोरे, महेश चव्हाण, पद्मसिंह पवार, संजय पाटील, जगदीश पाटील, प्रमोद पाटील, सुनील कानगुडे, परेश म्हात्रे, विनोद पाटील, सम्राट डाकी, अभय सागळे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)