शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पनवेलकर पाण्यासाठी टाटा पॉवरवर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 02:06 IST

पनवेल महापालिका पाण्याकरिता एमजेपी आणि पर्यायाने टाटा पॉवर कंपनीवर अवलंबून आहे. पाचशे कोटी रुपयांची जल अमृत योजना पूर्णत्वास आली तरी तहान भागेल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

अरुणकुमार मेहत्रे  कळंबोली : पनवेल महापालिका पाण्याकरिता एमजेपी आणि पर्यायाने टाटा पॉवर कंपनीवर अवलंबून आहे. पाचशे कोटी रुपयांची जल अमृत योजना पूर्णत्वास आली तरी तहान भागेल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. जोपर्यंत आपल्या मालकीचा जलस्रोत तयार होत नाही तोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणे कठीण असल्याचे काही अधिकारी खासगीत मत व्यक्त करतात.पाताळगंगा नदीतील पाणी उचलून एमजेपी भोकरपाडा येथे जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द करते. तेथून जलवाहिन्यांव्दारे पाणी जेएनपीटी, आजूबाजूची गावे, पनवेल शहर, सिडको वसाहतींना पुरविण्यात येते. पाताळगंगा नदी ही बारामाही स्वरूपाची नाही. ती हंगामी असल्याने तसे फक्त पावसाळ्यात पात्रात पाणी असते. मात्र खोपोलीत टाटा पॉवरचा वीजनिर्मिती प्रकल्प आहे. या ठिकाणी पाण्यावर वीजनिर्मिती करण्यात येत असल्याने उरलेले पाणी हे पाताळगंगा नदीत सोडले जाते. त्यामुळे वर्षभर नदीत पाणी दिसून येते. एकंदरीतच विचार केला तर या पाण्यावरच पनवेलकरांची तहान भागवली जाते. टाटा पॉवर प्रकल्प या परिसरातील लोकांचा जलदाता मानला जातो. या प्रकल्पासाठी घाटावर स्वतंत्र धरण आहे. त्याचबरोबर वर्षभर वीजनिर्मितीचे काम केले जात असल्याने या अगोदर पाण्याची टंचाई निर्माण होत नव्हती. परंतु गेल्या एक दीड वर्षापासून कामगारांच्या सुटीमुळे रविवारी वीजनिर्मिती प्रकल्प बंद ठेवण्यात येवू लागला आहे. तसेच इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी हे केंद्र बंद असते. या काळात वीजनिर्मिती होत नसल्याने पाणी बाहेर सोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे पनवेल शहराबरोबरच कळंबोली आणि नवीन पनवेलकरांना मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्र ारी येत आहेत. नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत ४ हजार ४0 सदनिका आणि २ हजार ६५0 सोसायट्या आहेत. कळंबोलीत पाच हजार ९00 सदनिका आणि सुमारे ११५0 सोसायट्या आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या सर्व ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याकरिता सिडकोला कमीत कमी ७0 एमएलडीची गरज आहे. पनवेल शहराला सुध्दा कमीत कमी तीस एमएलडीची तहान आहे. अगोदरच एमजेपीच्या जुनाट जलवाहिन्यांमुळे त्यांना फुटीचे ग्रहण लागले आहे. दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कारणांमुळे नवीन पनवेल आणि कळंबोलीतील रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.जलअमृत योजनेंतर्गत शासनाने पाचशे कोटींच्या योजनेला मंजुरी मिळाली असल्याचे दोन महिन्यापूर्वी अगोदरचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले होते. त्यातएमजेपीच्या जुनाट वाहिन्या बदलण्याचा प्रस्तावही होता. जरी नवीन जास्त क्षमतेच्या वाहिन्या टाकण्यात येणार असतील तरी नदीत पाणी नसेल तर पाणीपुरवठा होणार कसा असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.