शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशी रीलस्टारला ढकलले वेश्याव्यवसायात; अल्पवयीन मुलीची सुटका

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 17, 2024 18:11 IST

मावशीसह एका महिलेवर पोलिसांची कारवाई 

नवी मुंबई - बांग्लादेशमधून भारतात रिलस्टार बनण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला मावशीनेच वेश्याव्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून सर्वजण गोवा परिसरात राहणारे आहेत. ऑनलाईन ग्राहक मिळवून ते सीबीडीला आले असता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. 

एक महिला अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी ऑनलाईन ग्राहक शोधत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी उपनिरीक्षक स्नेहल आढे यांचे पथक केले होते. या पथकाने बनावट ग्राहक तयार करून महिलेला संपर्क साधला होता. त्यामध्ये शनिवारी दुपारी बेलापूर येथे भेटीचे ठिकाण ठरले होते.

यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. यावेळी अल्पवयीन मुलीसह दोन महिला त्याठिकाणी आल्या असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत त्या गोव्याच्या राहणाऱ्या असून मूळच्या बांग्लादेशी असल्याचे समोर आले. तसेच सर्वजण भारतात घुसखोरी करून आल्या असल्याचेही उघड झाले. तर अल्पवयीन मुलीकडे अधिक चौकशी केली असता ती रील स्टार बनण्यासाठी भारतात आली होती असे तिने सांगितले. भारतात मोठ्या प्रमाणात रील पाहिल्या व पसंद केल्या जात असल्याने ती मावशीसोबत आली होती. तिच्या आईचे बांग्लादेश मध्येच दुसरे लग्न झाले असून तेंव्हापासून मावशी तिचा सांभाळ करत आहे.

दरम्यान अल्पवयीन मुलीला भारतात आणल्यानंतर मावशीने इतर एका बांग्लादेशी महिलेसोबत मिळून तिला वेश्याव्यवसायात ढकलले. त्यासाठी त्या ऑनलाईन ग्राहक शोधायच्या. तर तिला घेऊन त्या इतर राज्यातही ग्राहकांच्या शोधात गेल्याचे समोर येत आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलीची सुटका करून दोन्ही महिलांवर सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.