शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक एड्स दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागृती

By योगेश पिंगळे | Updated: December 1, 2023 18:00 IST

स्वयंसेवकांडून विविध प्रकारचे पोस्टर्स व रांगोळी बनवून आणि प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली

नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्ताने जनजागृती करण्यात आली.

जागतिक एड्स दिन २०२३ ची थिम समाजाच्या पुढाकाराने -एड्सचा समूळ नाश करु" ही आहे. सदरच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आरआरसी क्लबचे कौन्सेलर जवंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतर महाविद्यालयांमधील विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमात स्वयंसेवकांनी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेड-रिबिन बांधून जनजागृती केली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक असून त्यांना या विषयाची सखोल माहिती असणे आवश्यक आहे  जनजागृती व्हावी, मूलभूत हक्क, कर्तव्य-जबाबदारी, यांबाबत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे असा होता.

स्वयंसेवकांडून विविध प्रकारचे पोस्टर्स व रांगोळी बनवून आणि प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्षा मोहिते या स्वयंसेविकेने भाषनातून एड्स दिनानिमित्त या रोगाची माहिती व संसर्ग या विषयी समजावून सांगितले. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेविका पौर्णिमा मोरे आणि श्रद्धा सूर्यवंशी यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शुभदा नायक, नवी मुंबई विभाग समन्वयक डॉ.पी.जी.भाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी आणि चेअरमन डॉ.एल.व्ही. गवळी आणि प्रा.अमित सुर्वे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.