शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘आवंदाचा शिमग्याचा सन दाराशी नय व्हनार’; गावठाण, शहरी भागात सार्वजनिक होळी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 02:34 IST

दिवाळे कोळीवाड्यात सायंकाळी ७ ते रात्रो ९ या वेळेत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होळी मातेचे दर्शन आणि रात्री ९.३० वाजता होळीला अग्नी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

अनंत पाटील नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या आनुषंगाने नवी मुंबईत साजरे होणारे होळी आणि धूलिवंदन सण,उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई आहे. तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक आणि खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे होळी, धूलिवंदन, रंगपंचमी साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे . 

.त्यामुळे आगरी कोळ्यांचा ‘आवंदाचा शिमग्याचा सन दाराशी नय व्हनार’  हे शाहीर रमेश नाखवा यांचे ‘आमचे दाराशी हाय शिमगा’ हे शिमग्याचे गाणे घराघरात वाजेल, हे मात्र नक्कीच. असे असले तरी दिवाळे कोळीवाड्यात शासनाच्या आदेशाचे पालन करून रविवारी रात्री होळीला अग्नी देण्यात येणार आहे.  दिवाळ‌े कोळीवाड्यात सायंकाळी ७ ते रात्रो ९ या वेळेत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होळी मातेचे दर्शन आणि रात्री ९.३० वाजता होळीला अग्नी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

दरवर्षी मात्र या कोळीवाड्यात सलग नऊ दिवस आधीपासूनच शिमग्याच्या सणाला सुरुवात होत असे. कोरोनाच्या महामारीमुळे या शिमग्याचा सणाला जाता येणार नसल्यामुळे महिलांचा हिरमोड होणार आहे. रंगपंचमीसाठी लागणाऱ्या रंगीबेरंगी रंगाची फारशी उधळण होणार नाही. त्यामुळे होळीच्या एक महिन्या अगोदरपासून होलसेल विक्रेत्यांनी आणलेल्या रंगांचा साठा तसाच पडून राहण्याची शक्यता एपीएमसीमधील एका व्यापाऱ्याने व्यक्त केली.  

ऑर्गेनिक रंग वापरा‘आपल्याला होळी रंगांनीच खेळायची आहे, तर यासाठी आपण ऑर्गेनिक रंगांचा वापर करू शकता. आपल्या स्वयंपाक घरात असे बरेच पदार्थ आहे ज्यांचा वापर आपण रंग बनविण्यासाठी करू शकतो. हे हानिकारकदेखील नसणार रंग बनविण्यासाठी आपण हळद, मेंदी पावडर, बीट आणि चंदन पावडरचा वापर करू शकता.’ - रामनाथ म्हात्रे, तुर्भेगाव

रंगांनी नव्हे तर फुलांनी होळी खेळाबरेच लोक असं मानतात की होळीचा सण रंगाशिवाय अपूर्ण आहे. परंतु यंदा आपण कोरोनामुळे होळी रंगांच्या ऐवजी फुलांनी खेळू शकता. यामुळे रासायनिक रंगाचा त्रास  होणार नाही. आपण नैसर्गिक फुलांचा वापर करून होळी खेळू शकता.’ - हेमंत कोळी, ग्रामस्थ, दिवाळे कोळीवाडा 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या