शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळांच्या पटसंख्येसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 02:40 IST

विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविता यावी, यासाठी रायगड जिल्ह्यात विशेषकरून पनवेल तालुक्यात मराठी शाळांचा आटापिटा सुरू आहे.

पनवेल : शिक्षकांना आगामी शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थी मिळविण्यासाठी ठिकठिकाणी जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविता यावी, यासाठी रायगड जिल्ह्यात विशेषकरून पनवेल तालुक्यात मराठी शाळांचा आटापिटा सुरू आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांसह इतरांनी विद्यार्थी शोधण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहर आणि गावात आता शिक्षक पालकांसमोर विनवणी करीत असून, पालक व विद्यार्थ्यांना आमिष दाखवून दाखले मिळविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. विशेषत: शहराला लागून असलेल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच अनुदानित शाळांच्या गुरुजींना पटसंख्या टिकविण्यासाठी भटकावे लागत आहे. गाव तेथे शाळा यातून अनेक जण संस्थाचालक-मालक झाले आहेत; मात्र वाढत्या शाळांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर झाला आहे. त्यातच पालकांचा पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकविण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना विद्यार्थी मिळणे दुरापास्त झाले आहे. सर्वांनाच आता शहराची ओढ लागल्याने आणि त्यासाठी आवश्यक संसाधनेही उपलब्ध असल्याने ग्रामीण भागात आपल्या पाल्याला शिकविण्याची मानसिकता पालकांची राहिलेली नाही. परिणामी ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या वेगाने रोडावत आहे. पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सर्वाधिक महत्त्व देताना आढळून येतात. त्यामुळे मराठी शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. हीच बाब या शाळांवरील शिक्षकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिक्षक मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शोधात घरोघरी फिरताना दिसून येत आहेत. आपल्याच शाळेला विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पालकांना व त्यांच्या पाल्यांना विविध आमिषे दाखविली जात आहेत. शाळेचे महत्त्वही पटवून देण्यात येत आहे. शाळेचा निकाल, क्र ीडा साहित्य, मोफत पुस्तके व इतर शालेय साहित्य तसेच शाळेत चालणाऱ्या विविध उपक्र मांची माहिती शिक्षक पालकांना त्यांच्या घरी जाऊन देत आहेत. हीच शोकांतिका आदिवासी आश्रमशाळांची आहे. शिक्षकांना विद्यार्थी मिळविण्यासाठी झोपडपट्टी, वाडे आणि पाड्यावर भटकावे लागत आहे. यावेळी ग्रामीण भागातील पालकांमधूनही या शिक्षकांना विविध प्रश्न विचारून त्यांची कसोटीच बघितली जात आहे.