शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात विषप्राशन करून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 01:30 IST

तडफडणाऱ्या तरुणाला बघण्यासाठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : घणसोली येथे भररस्त्यात तरुणाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. हा तरुण अर्धा तास रस्त्यावर तडफडत असताना नागरिकांनी  बघ्याची भूमिका घेतली. अखेर एका तरुणाने पोलिसांना कळवले असता पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.

घणसोली गावाच्या प्रवेशमार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून आलेला एक तरुण तेथे थांबला होता. काही वेळातच तो कोसळल्याचे काही व्यक्तींनी पहिले. त्याच्या मदतीसाठी काही जण पुढे धावले असता, तेथे फिनाईलची बाटली पडल्याचे आढळले. त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. फिनाईल त्याच्या शरीरात गेल्याने तो पडलेल्या जागी तडफडत होता.  एका प्रत्यक्षदर्शीने याची माहिती रबाळे पोलिसांना दिली. त्यानुसार दोन पोलीस त्या ठिकाणी आले असता त्यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका मागवली. मात्र ती वेळेवर न आल्याने व तरुणाची प्रकृती खालावू लागल्याने रिक्षातून त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी त्याच्याकडील बॅग तपासली असता त्यामध्ये त्याचे ओळखपत्र सापडले. यावरून त्याचे नाव लक्ष्मण पवार असून तो रेड बॉय सुरक्षा एजन्सीमार्फत सुरक्षारक्षकाची नोकरी करतो. मात्र त्याच्या राहण्याच्या ठिकाणाविषयी उशिरापर्यंत माहिती समोर आलेली नव्हती. शिवाय त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचादेखील उलगडा झालेला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई