शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

डी जी कन्स्ट्रक्शनचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 18, 2016 02:16 IST

पालघर नगरपरिषदेने १३ लाखाहून अधिक निधी खर्च करून तयार केलेल्या एकता नगरच्या रस्त्याची अवघ्या सहा महिन्यातच चाळण झाल्याची बातमी लोकमतमध्ये

हितेन नाईक-निखिल मेस्त्री/ पालघर

पालघर नगरपरिषदेने १३ लाखाहून अधिक निधी खर्च करून तयार केलेल्या एकता नगरच्या रस्त्याची अवघ्या सहा महिन्यातच चाळण झाल्याची बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच नगरपरिषदेने तात्काळ त्याची दखल घेऊन ठेकेदार डी. जी.पाटील कन्सट्रक्शनने बांधलेल्या या निकृष्ट दर्जाच्या काँक्रीट रस्त्यावर सिमेंटचा मुलामा देऊन आपला भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची जनतेची मागणी मात्र दुर्लक्षिली आहे.पालघर नगरपरिषदेने नंडोरे नाक्यानजीक आपल्या कार्यक्षेत्रातील एकता नगर वसाहतीतील १३ लाख ५७ हजार इतका खर्च करून सिमेंट काँक्र ीट रस्ता व गटारांची काम केली होती. हा रस्ता बनवल्यानंतर सहा महिन्यातच या रस्त्याची व गटारांची दुरवस्था झाल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते त्याची दखल नगरपरिषदेने लगेचच घेतल्याने ठेकेदार डी. जी.पाटील यांनी या रस्त्यावर सिमेंट काँक्र ीटच्या मिश्रणाचा थर टाकून या रस्त्याची दुरु स्ती सुरू केली आहे. रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा त्यावर अशा प्रकारची डागडुजी करावी लागणे, ही एक प्रकारची मलमपट्टीच आहे. नगर परिषदे मार्फत मागील २-४ वर्षात करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची रस्त्यांची विकास कामे किती निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत हे शहरात फिरल्यावर दिसून येते. या कामाच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत.नगरपरिषद ठेकेदार डी. जी. पाटील कन्सट्रक्शनकडून रस्त्याची दुरु स्ती करून घेत आहे याचा अर्थ रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यावर शिक्कामोर्तबच होत असून ठेकेदारानी केलेल्या कामाची गुणवत्ता चाचणी नगरपरिषदेने घेणे गरजेचे आहे. या कामासाठी वापरलेले साहित्य अंदाजपत्रकीय आरखड्याप्रमाणे पुरेसे व आवश्यकत्या गुणवत्तेचे वापरले आहे कि नाही, याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. नगराध्यक्ष उत्तम पिंपळे आणि मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी या साहित्याचे नमुने कोकण विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागात गुणवत्ता चाचणी करीता पाठवून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया राबवायला हवी अशी मागणी होत आहे. परंतु कारवाई होण्या ऐवजी नगरपरिषद व ठेकेदार डी. जी.पाटील दोघेही संगनमताने मलमपट्टी लावण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे.