शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लंकेश यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, वाशीत निषेध सभा : आरोपींचा शोध घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:20 IST

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या हत्येच्या निषेधार्थ गुरुवारी वाशी येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबईतील विवेक-विचार मंचच्या वतीने वाशी रेल्वे स्थानकावर निषेध व्यक्त करण्यात आला.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यानंतर महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे लेखणीवर घात झाल्याचा असंतोष व्यक्त करण्यात आला. या ठिकाणी अंधश्रध्दा निर्मूलन समिती, वाशीतील साहित्य मंदिर, चर्मकार संघटना, नवी मुंबई म्युझिक अ‍ॅण्ड ड्रामा सर्कल, पत्रकार संघटना तसेच शहरातील सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याकरिता आयोजित सभेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.निषेध सभेत बोलताना २०१३ पासून ते आतापर्यंत २२ पत्रकारांवर हल्ला झाल्याची माहिती अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक अजित मगदूम यांनी दिली. परखडपणे बोलणाºया व्यक्तींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही मगदूम यांनी स्पष्ट केले. अशा घटना पाहून लोकशाहीचा अंत होत असल्याची नाराजी नवी मुंबई म्युझिक अ‍ॅण्ड ड्रामा सर्कलचे विवेक भगत यांनी व्यक्त केली. तसेच महिला पत्रकारावर झालेला हल्ल्याचा हा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो की काय असेच भीतीचे वातावरण पत्रकारांमध्ये पसरल्याचे वक्तव्य पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले. मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही अशी आक्रमक भूमिका ज्येष्ठ समाजसेविका वृषाली मगदूम यांनी व्यक्त केली. या घटनेबाबतची सर्वतोपरी चौकशी केली जाऊन आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी करण्यात आली.गौरी लंकेश यांचे बलिदान वाया जाणार नाही असे म्हणत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेध सभेत अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक अजित मगदूम, नवी मुंबई म्युझिक अ‍ॅण्ड ड्रामा सर्कलचे विवेक भगत, ज्येष्ठ समाजसेविका वृषाली मगदूम, कवी साहेबराव ठाणगे-पाटील, मराठी साहित्य मंदिराचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.