शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

केटामाइन पावडरसह हेरॉइन विकणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 23:53 IST

शहरात अमली पदार्थांची विक्री करणा-या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : शहरात अमली पदार्थांची विक्री करणा-या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये दोघा सराईत गुन्हेगारांचा समावेश असून त्यांच्याकडून केटामाइन पावडर, हेरॉइन तसेच गांजा असे अमली पदार्थ जप्त केल. त्याची किंमत २७ लाख रुपये असून महाविद्यालय परिसरात त्यांच्याकडून पदार्थांची विक्री केली जात होती.नवी मुंबईत अमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांकडून कारवार्इंचा धडाका सुरू आहे. मागील तीन दिवसांत कोपरखैरणेतून चौघांना अटक केली असून त्यामध्ये पुरवठा करणाºयाचही समावेश आहे. परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. कादर तुकू शेख (२२), असे गुन्हेगाराचे नाव असून तो जुहूगावचा राहणारा आहे. तीन दिवसांपूर्वी कोपरखैरणे रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमधून शंकर निकम याला अमली पदार्थाची नशा करताना पकडण्यात आले होते. त्याच्या माहितीवरून टोनी वर्मा व पंकज वर्मा या भावांना दुसºया दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत कादर याची माहिती समोर आल्यानंतर गुरुवारी कोपरखैरणेतील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या आवारातून त्याला अटक करण्यात आली. झडतीत त्याच्याकडे ११.४० ग्रॅम हेरॉइन व दुचाकीच्या सिटखाली एक किलो ७० ग्रॅम गांजा आढळून आला.त्याचप्रमाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी पनवेलमध्ये कोळखे गावातून संभाजी अर्जुन सोनवणे (३०) याला अटक केली आहे. तो खालापूरचा राहणारा आहे. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांना याबाबत माहिती मिळाली होती. यानुसार उपआयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळखे गावात सापळा रचण्यात आला. या वेळी संभाजी संशयास्पदरित्या वावरताना आढळला. झडतीत त्याच्याकडे ६०० ग्रॅम केटामाइन पावडर आढळून आली. बाजारभावानुसार त्याची किंमत २६ लाख रुपये आहे. ही पावडर घेऊन तो परिसरात विक्रीसाठी आला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.