शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

लूटमार करणाऱ्या मोलकरणीला अटक

By admin | Updated: August 7, 2016 03:24 IST

घरकामासाठी नोकरी मिळवुन संधी साधुन लुटमार करणारया मोलकरनीला एनआरआय पोलीसांनी अटक केली आहे. तिच्याकडून नुकत्याच घटनेत चोरीला गेलेला मुद्देमाल देखिल

नवी मुंबई : घरकामासाठी नोकरी मिळवुन संधी साधुन लुटमार करणारया मोलकरनीला एनआरआय पोलीसांनी अटक केली आहे. तिच्याकडून नुकत्याच घटनेत चोरीला गेलेला मुद्देमाल देखिल जप्त करण्यात आला आहे. वाशी रेल्वेस्थानकाच्या आवारात प्रियकरासह आली असता ती पोलीसांच्या जाळ्यात अडकली.श्वेता हडप्पन (२०) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. सिवुड सेक्टर ४४ए मधील सखुमोरेश्वर अपार्टमेंटमध्ये ती नोकरीच्या बहाण्याने गेली होती. यावेळी सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केल्यानंतर त्याच सोसायटीत राहणारया अर्चना मलान यांना मोलकरनीची गरज असल्याचे तिला समजले. यानुसार तिने मलान यांची भेट घेवुन घरकामासाठी नोकरी मिळवली होती. यादरम्यान मलान यांनी तिच्याकडे परिचय पत्राची मागणी केली असता दोन दिवसात देते असे सांगितले होते. त्यापुर्वीच मलान ह्या घराबाहेर गेल्या असता अवघ्या अर्ध्या तासात तिने घरात चोरी करुन पलायन केले होते. रोख रक्कम व हिरेजडीत सोन्याचे दागिणे असा सुमारे २१ लाख ५२ हजार रुपये किमतीचा ऐवज घेवुन ती फरार झाली होती. याप्रकरनी एनआरआय पोलीसठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर तपासादरम्यान एका सिसिटीव्हीमध्ये ती दिसुन आली. त्याद्वारे तीची ओळख पटवण्यासाठी उपआयुक्त प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त धनराज दायमा, वरिष्ठ निरिक्षक शेखर बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली होती. तिचे छायचित्र इतर ठिकाणच्या पोलीसांकडे पाठवली असता, तिचे नाव व कर्नाटकचा पत्ता मिळाला. परंतु त्याठिकाणी पोलीसांचे पथक गेले असता, ती तिकडे येवुन परत मुंबईला गेल्याचे समजले. अखेर वाशी रेल्वेस्थानक आवारात प्रियकराच्या भेटीसाठी ती आली असता, पोलीसांनी सापळा रचुन तिला ताब्यात घेतले. अंग झडतीमध्ये तिच्याकडे मलान यांच्या घरातुन चोरलेले काही दागिणे आढळून आले. यानुसार तिला अटक करुन तिच्याकडून चोरीचे दागिणे व रोख रक्कम असा १ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. तिने अशाच प्रकारे इतर अनेक ठिकाणी लुटमारी केल्याची कबुली एनआरआय पोलीसांना दिली आहे. (प्रतिनिधी)