शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पदे मंजूर; मग भरती का नाही?, ठाणे जिल्ह्यातील उपलब्ध औषध निरीक्षकांवर कामाचा ताण

By योगेश पिंगळे | Updated: August 31, 2023 10:16 IST

औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीचा व्यवसाय सुरू करताना सुरक्षा कायद्यानुसार शासनाच्या अन्न व औषध विभागात त्याची नोंदणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

नवी मुंबई : औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने औषध विभाग सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची असते. ठाणे जिल्ह्यात औषध निरीक्षकांची पदे मंजूर असताना भरती न केल्याने उपलब्ध औषध निरीक्षकांवर कामाचा ताण वाढला आहे.

औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीचा व्यवसाय सुरू करताना सुरक्षा कायद्यानुसार शासनाच्या अन्न व औषध विभागात त्याची नोंदणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. औषधांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री यांची वेळच्या वेळी तपासणी करण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे आहे.

औषधी विक्रीची दुकाने, गोदामे किंवा औषध निर्मिती कारखाने यांची वेळोवेळी तपासणी एफडीएच्या माध्यमातून केली जाते. काही महिन्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या झाल्या आहेत. सद्यस्थितीत औषध निरीक्षकांची राज्यात सुमारे २०० पदे मंजूर आहेत परंतु भरती रखडल्याने सद्य स्थितीत ८७ औषध निरीक्षकांवरच कामाचा गाडा सुरु आहे.

संपूर्ण विभागाची जबाबदारी केवळ १६ निरीक्षकांवरठाणे जिल्ह्यासाठी २२ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात ६ औषध निरीक्षक कर्तव्यावर असून ठाणे विभागात एकूण ४२ पदे मंजूर असताना संपूर्ण विभागाची जबाबदारी फक्त १६ औषध निरीक्षकांवर आहे. औषध निरीक्षक पदे भरती होत नसल्याने कर्तव्यावर असलेल्या औषध निरीक्षकांवर कामाचा ताण वाढला असून औषधे विक्री करणाऱ्यांनादेखील विविध अडचणी येत आहेत. याबाबत ठाणे जिल्ह्याचे औषध संयुक्त आयुक्त दुष्यंत भामरे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

टॅग्स :medicineऔषधं