शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी

By admin | Updated: June 2, 2017 05:45 IST

येथील रहदारीची गहन समस्या निर्माण झाल्यामुळे मुख्य रस्त्यांवर पर्यटकांना तसेच नियमितपणे वर्दळ असलेल्या स्थानिकांना

माथेरान : येथील रहदारीची गहन समस्या निर्माण झाल्यामुळे मुख्य रस्त्यांवर पर्यटकांना तसेच नियमितपणे वर्दळ असलेल्या स्थानिकांना पायी चालताना घोड्यांच्या गर्दीमुळे तसेच लीदमिश्रित धुळीमुळे पायी प्रवास करणे अत्यंत त्रासदायक होत आहे. त्यामुळे घोड्यांना मुख्य रस्ता असणाऱ्या महात्मा गांधी मार्गावरून पूर्णत: बंदी करून त्यांची कस्तुरबा रोड मार्गे वाहतुक सुरू करण्यात यावी या मुख्याधिकारी घोलप यांच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाचे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वागत करण्यात आले. नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नुकतीच नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित केली होती. यावेळी मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप, गटनेते प्रसाद सावंत यांसह विरोधी पक्षाचे विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदे आणि एकूण पंधरा सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सकारात्मक विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. दस्तुरी नाक्यावर पर्यटकांच्या सुखकर प्रवासासाठी त्यांची कुठल्याही प्रकारे दिशाभूल न होता योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी दस्तुरीच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करून त्यांना योग्य माहिती मिळण्यासाठी घोडा, हातरिक्षा, हमालांचे वाजवी वाहतूक दर तसेच अन्य महत्त्वपूर्ण माहिती आॅडीयो क्लिपद्वारे समजून त्यांची दिशाभूल थांबावी, यासाठी आॅडीयो क्लिपची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी तेव्हाच दस्तुरी येथील पर्यटकांची पिळवणूक थांबेल, या गटनेते प्रसाद सावंत यांच्या पर्यटनाला वाव देणाऱ्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.नगरपालिकेत कामगार वर्ग अपुरा असल्याने येथील अनेक कामे खोळंबली आहेत. त्यासाठी येथे मानधनावर अथवा रोजगारावर कामगारांना सामावून घेण्यात यावे. सुशिक्षित बेकार युवकांना या माध्यमांतून रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते, असेही प्रसाद सावंत यांनी मुख्याधिकारी घोलप यांना सूचित केले. नगरपालिकेतील सभापतींंच्या आपापल्या प्रभागातील विकासकामांबाबत आपल्याकडे माहिती पोहोचत नसल्याने सभापतींंच्या बद्दल नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपालिकेच्या शाळेच्या बाबतीत विविध शैक्षणिक साहित्य तसेच अत्यावश्यक शालेय साधनसामुग्री खरेदीच्या विषयांचे वाचन तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांमार्फत वृक्षारोपण करण्याचा विषय शिक्षण सभापती नरेश काळे यांनी सूचवला. वनसमिती गठित करण्याच्या विषयांवर सत्ताधारी गटाने आम्ही या समितीसाठी नावे तयार केली आहेतच, असे सूचित केल्यावर विरोधी पक्षाचे शिवाजी शिंदे यांनी आमच्याकडून सुद्धा काही नावे या समितीवर घ्या, असे स्पष्ट केल्यावर हे प्रकरण अधिक चिघळू नये, यासाठी नव्या वनसमितीच्या निवडीचे प्रकरण तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. यावेळी अभियंता देवेंद्र मोरखंडीकर आदी कर्मचारी उपस्थित होते.नव्याने काढलेल्या निविदेबाबतीत केवळ सत्ताधारी गटातील कार्यकर्त्यांना निविदेत स्थान न मिळाल्यामुळे १२ मे रोजी पावसाळ्यात होणाऱ्या कामांच्या निविदा वर्तमानपत्रात चार दिवसांतच प्रसिद्ध झाल्याबाबतीत सत्ताधारी मंडळींना ही निविदा रद्द करण्याबाबतसुद्धा काही कर्मचारी वर्गाने प्रेरित केल्यावरून पक्षातील आपल्याच मर्जीतील कार्यकर्त्यांना ही कामे न मिळाल्यामुळे नवखे बांधकाम सभापती शकील पटेल यांनी ही निविदा आपल्याला मान्य नसल्याचे स्पष्ट केले, त्यास सत्ताधारी गटाने दुजोरा दिला. नगरपालिकेतील सभापतींंच्या आपापल्या प्रभागातील विकासकामांबाबत आपल्याकडे माहिती पोहोचत नसल्याने सभापतींंच्या बद्दल नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.