शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्याला पनवेलच्या महासभेत मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 02:22 IST

महापालिकेचा शहर सुनियोजन विकास आराखडा तयार झाला असून बुधवारी झालेल्या महासभेत त्याला मंजुरी देण्यात आली.

पनवेल : महापालिकेचा शहर सुनियोजन विकास आराखडा तयार झाला असून बुधवारी झालेल्या महासभेत त्याला मंजुरी देण्यात आली. भविष्यात पनवेल महापालिकेच्या विकासासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याकरिता आवश्यक निधीचा लेखाजोखा या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मांडण्यात आला आहे.महापालिका हद्दीतील नागरिकांच्या सर्वांगीण गरजा पूर्ण करण्यासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद केले आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी, शहर सुनियोजन विकास आराखडा बनविण्याला प्राधान्याने सुरुवात केली.वर्षभरापासून सुरू असलेले काम अखेर पूर्ण झाले आहे. शहरात नागरी, सामाजिक, मूलभूत सुविधांचा अभ्यास, भविष्यात शहराला कशाची गरज आहे, सद्यस्थितीत महापालिका कोणत्या गोष्टीचा विकास करू शकते, आदीचा अहवाल बनविण्यात आला आहे.क्रिसिल रिस्क अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन लिमिटेड या कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सदस्य नगरसेवक, वकील, डॉक्टर, सेवाभावी संस्था, रिक्षा संघटना यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रत्येकांचे मत नोंदवून अहवाल तयार केला आहे.पनवेल महापालिकेकडे सध्या अस्तित्वात असलेल्या बाबींचा विचार करून भविष्यातील वाढणारी लोकसंख्या, बागबगिचे, पाणी, रस्ते, ड्रेनेज, आपत्कालीन व्यवस्था, पथदिवे यांचा एकत्रित अभ्यास केला आहे. तीन टप्प्यात करण्यात आलेल्या अहवालात २०१५ पर्यंत शहरातील पायाभूत आणि नागरी सुविधांसाठी ५८८८, २०३२ पर्यंत २०५३.२७ आणि २०४१ पर्यंत २५७२.७८ असा एकूण १० हजार ५१४. ४२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार असल्याचा अंदाज अहवालात नमूद केला आहे. विकासकामांची ११ प्रकारांत विभागणी करण्यात आली होती. आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी उपस्थित नगरसेवकांना या शहर सुनियोजन विकास आराखड्याबद्दल माहिती दिली.ड्रेनेज, गटारे आदीसह विविध सेवांचा दर्जा सध्या काय आहे, भविष्यात या सेवांचा दर्जा कसा असेल, या सर्व बाबींची बारकाईने माहिती शहर सुनियोजन विकास आराखड्यात नमूद करण्यात आली आहे. या आराखड्याचा उपयोग भविष्यात शहराच्या विकासासाठी होणार आहे.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिका 

टॅग्स :panvelपनवेल