शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १८८ विंधण विहिरींना मंजुरी

By admin | Updated: April 20, 2016 02:32 IST

रायगड जिल्ह्यातील बहुतांश गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत १८८ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे

आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्ह्यातील बहुतांश गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत १८८ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे ८८ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्रशासनाचे हे धोरण म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्याचा हा फटका आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असणाऱ्या धराणांतील वर्षानुवर्षे गाळच काढलेला नाही. त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये कमी पाणी जमा होते. काही ठिकाणच्या तर पाणीपुरवठ्याच्या योजनाच या अर्धवट स्थितीत पडून असून, काही योजना या दुरुस्तीअभावी रखडलेल्या आहेत. याचा एकत्रित परिणाम म्हणून पाणी समस्या निर्माण झाली असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने १५ तालुक्यांमध्ये ५७७ विंधण विहिरी खोदण्यास टंचाई कृती आराखड्यात स्थान दिलेले आहे. मात्र सध्या प्रत्यक्षात गरज लक्षात घेता १८८ विंधण विहिरींना नुकतीच मान्यता दिली आहे. काही तालुक्यांमध्ये १५ तर काही तालुक्यांमध्ये २० विंधण विहिरींच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी प्रत्येकी ४७ हजार रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अरविंद टोरो यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हा परिषदेकडे सध्या १० लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. कामे सुरू केल्यावर लागेल तसा निधी प्राप्त केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईची समस्या ही साधारणपणे एप्रिल महिन्यात सुरू होते आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उग्ररूप धारण करते. त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.