शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांत बायोमेट्रिक यंत्रणा बसवा

By admin | Updated: April 19, 2016 02:18 IST

पोलादपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामासाठी नागरिकांना विविध कार्यालयात जावे लागते, मात्र कर्मचारी व अधिकारी कार्यालयात वेळेत उपस्थित नसल्याने पहिल्याच वेळेत

पोलादपूर : पोलादपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामासाठी नागरिकांना विविध कार्यालयात जावे लागते, मात्र कर्मचारी व अधिकारी कार्यालयात वेळेत उपस्थित नसल्याने पहिल्याच वेळेत काम झाले आहे असे होत नाही. यामुळे नागरिकांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे. किमान चार ते पाच वेळा फेऱ्या मारल्यावर काम होते अशी स्थिती तालुक्यातील कार्यालयांची आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामात शिस्तबद्ध व वक्तशीरपणा यावा यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा प्रणाली अमलात आली आहे; परंतु पोलादपूर तालुक्यातील बहुतेक शासकीय कार्यालयांमध्ये अद्यापही या यंत्रणेचा अभाव दिसून येत आहे.राज्यात ई-प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागात प्रशासकीय यंत्रणा हायटेक होत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी व अधिकारी वेळेवर कामावर हजर व्हावेत, याची नोंदणी होण्यासाठी बायामेट्रिक यंत्रणा (थम्ब) कार्यान्वित करण्यात आली आहे.मात्र पोलादपूर तालुक्यातील सरकारी कार्यालयांत अशी सुविधा नसल्याने कर्मचारी मनाला वाटेल तेव्हा येतात व जातातही. अधिकारी व कर्मचारी यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणीही नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. कामे वेळेवर होत नसल्याने दूर गावांतून कामासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड व नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. किरकोळ कामासाठीही चार-पाच दिवस फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे वेळ तर वाया जात आहेच सोबत पैसेही. अधिकारी व कर्मचारी कार्यालयात येण्याआधीच ग्रामस्थ पोहोचलेले असतात मात्र कार्यालयीन वेळेचे कोणतेही भान अधिकारी व कर्मचारी यांना नसते.तालुक्यातील सरकारी कार्यालयांना भोंगळ कारभाराचे ग्रहण लागल्याची संतप्त प्रतिक्रि या नागरिक व्यक्त करत आहेत. पोलादपूर तालुक्यात तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, पोस्ट आॅफिस,सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, सार्वजनिक बांधकाम (जिल्हा परिषद) कार्यालय,महिला व बालकल्याण कार्यालय, ग्रामीण रु ग्णालय, तलाठी , पंचायत समिती, वन विभाग कार्यालय, महावितरण कार्यालय अशी कार्यालये आहेत. थोड्या फार फरकाने सर्व कार्यालयाची स्थिती सारखीच असल्याचे नागरिक सांगतात. (वार्ताहर)