शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सिडको क्षेत्रात १0 टक्के पाणीकपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 02:42 IST

प्रखर उन्हामुळे धरणातील जलसाठा कमी होत चालला आहे. पावसाळ्याला आणखी दोन महिन्यांचा अवकाश आहे.

नवी मुंबई : प्रखर उन्हामुळे धरणातील जलसाठा कमी होत चालला आहे. पावसाळ्याला आणखी दोन महिन्यांचा अवकाश आहे. अशात पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पुढील वर्षासाठी पाणीसाठा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने सिडकोने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिडको क्षेत्रात पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.नवी मुंबई महापालिकेचे मोरबे, एमआयडीसीचे बारवी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाताळगंगा आणि सिडकोच्या हेटवणे धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुध्दा समाधानकारक पावसाचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. परंतु पावसाने दगा दिलाच तर पुढील वर्षासाठी पाण्याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असते. त्यानुसार सिडकोने नवीन पनवेल, काळुंद्रे, कळंबोली, नावडे, कामोठे, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि उलवे या क्षेत्रात १९ मार्चपासून १0 टक्के पाणीकपात लागू केली आहे. उन्हाळ्यात पाण्याचा अधिक वापर होतो. असे असले तरी भविष्याची गरज ओळखून पाण्याचा जपून वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांतील नळाला लागलेली गळती, फुटक्या जलवाहिन्या, इमारतीच्या साठवण टाक्यांतून पाण्याची होणारी गळती थांबवावी. शॉवरऐवजी बादलीत पाणी घेवून आंघोळ करावी, कपडे धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा, अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत.>पाणीकपातीनंतर सध्याची स्थितीसिडको नोड पाण्याची गरज सध्याचा पुरवठाखारघर ७0 एमएलडी ६५ एमएलडीकळंबोली ४३ एमएलडी ३८ एमएलडीकामोठे ३८ एमएलडी ३५ एमएलडीनवीन पनवेल ४२ एमएलडी ३८एमएलडी