शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 02:21 IST

दत्तक घेतलेल्या पालकांसाठी आर्थिक मदत योजनांचा समावेश

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती मोनिका महानवर यांनी केले आहे. या योजनांमध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती, खेळाडूंना आर्थिक मदत, तसेच मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना आर्थिक मदत या योजनांचा यामध्ये समावेश आहे.   यामध्ये शिष्यवृत्ती योजनेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस विद्यार्थिनीसाठी १ लाख, बीएएमएस विद्यार्थिनीसाठी ५० हजार, बीएचएमएस विद्यार्थिनीसाठी ५० हजार प्रथम वर्ष वगळता प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. दुसरी योजना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक, सांघिक कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंसाठी या योजनेत राज्यस्तरीय वौयक्तिक खेळाडूंसाठी दहा हजार व संघासाठी २५ हजार, तसेच राष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक खेळाडूंसाठी २५ हजार व संघासाठी ५० हजार रुपये आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे.    तिसऱ्या योजनेचा लाभ अनाथ व निराधार मुलींचा सांभाळ करणाऱ्या पालकांना घेता येणार आहे. अनाथ मुलींना दत्तक घेणाऱ्या पालकांसाठी प्रोत्सहात्मक रक्कम म्हणून २५ हजारांचे अनुदान पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने काढलेल्या पत्रकात माहिती दिली आहे. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी हे परिपत्रक काढले आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या या योजना गरजूंसाठी लाभदायक आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी १० मार्चपर्यंत या विभागात अर्ज करण्याचे अवाहन सभापती मोनिका महानवर यांनी केले आहे.

महिला व बालकल्याण विभागाच्या या योजना गरजूंसाठी लाभदायक आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी १० मार्चपर्यंत या विभागात अर्ज करण्याचे अवाहन सभापती मोनिका महानवर यांनी केले आहे.