शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोचा आणखी एक विक्रम, ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण

By कमलाकर कांबळे | Updated: August 28, 2022 19:46 IST

मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृहबांधणी क्षेत्रात नवीन विक्रम 

नवी मुंबई: मिशन ९६ अंतर्गत ९६ दिवसांत ९६ सदनिकांचे काम पूर्ण करून गृहबांधणी क्षेत्रात नवीन विक्रम करणाऱ्या सिडकोने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. तळोजा येथे सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पात अवघ्या ४८९ दिवसांत ५०० स्लॅबचे काम पूर्ण करून सिडकोने गृहनिर्माण क्षेत्रात आणखीन एक विक्रम आपल्या नावावार कोरला आहे. सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. या योजनेतील घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल  आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे घरांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता घरांचे बांधकाम कमी कालावधीत पूर्ण करण्यावर सिडकोचा भर आहे. यापूर्वी मिशन 96 अंतर्गत प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सिडकोने बामणडोंगरी येथे केवळ ९६ दिवसांत  ९६ सदनिकांचा समावेश असलेल्या १२ मजली  इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. 

सिडकोने केलेल्या या कामाचे जगभरातून कौतूक झाले होते. त्यानंतर प्रीकास्ट याच तंत्रज्ञानाचा वापर करीत सिडकोने तळोजा सेक्टर २८, २९, ३०  आणि ३७ मध्ये उभारण्यात येत इमारतींच्या ५०० स्लॅबचे काम अवघ्या ४८९ दिवसांत पूर्ण करून गृहनिर्माण क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व सिध्द केले  आहे. दिवसाला १.०२ स्लॅब या विक्रमी वेगाने, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामच्या दर्जाशी कोणतीही तडजोड न करता सिडकोने हे काम पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडकोचे वास्तुशास्त्रज्ञ, नियोजनकार, अभियंते आणि प्रकल्प सल्लागारांसह इतर संबधित घटकांचे ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे. दरम्यान, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गृहनिर्माण योजनेतील घरांचे बांधकाम कमीत कमी कालावधीत पूर्ण करण्याचे सिडकोचे  उद्दिष्ट आहे. हे करीत असताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची  दक्षता घेतली जात आहे. 

एकूणच सर्वसामान्यांना कमी कालावधीत दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिडकोने उचलेले हे सकारात्मक पाउल आहे. ५०० स्लॅबचे केवळ ४८९ दिवसांत पूर्ण केलेले बांधकाम  हे या उद्दिष्टातील मिशन ९६ नंतरचा पुढील टप्पा असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी  यांनी स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको