शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल नगर परिषदेच्या आरक्षणाची सोडत जाहीर

By admin | Updated: July 3, 2016 03:27 IST

वर्षाच्या शेवटी होणाऱ्या रायगड जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाली. पनवेल नगर परिषदेच्या नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत १९ प्रभागांच्या

पनवेल : वर्षाच्या शेवटी होणाऱ्या रायगड जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाली. पनवेल नगर परिषदेच्या नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत १९ प्रभागांच्या संख्येत वाढ होऊन २४ झाली आहे. त्यामुळे पनवेल नगर परिषदेत एकूण १० नगरसेवक वाढणार आहेत. राज्यातील मोठ्या नगरपालिकेत पनवेल नगरपालिकेचा समावेश होतो. नगर परिषदेच्या आरक्षणाची सोडत शनिवार वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीमुळे बहुतांशी विद्यमान नगरसेवकांना प्रभाग रचनेत बदल झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेल्या कार्यक्रमांतर्गत प्रांताधिकारी भरत शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये शहरातील २४ प्रभागांचे नकाशे, व्याप्ती व चतु:सीमा नागरिकांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या. मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी २४ प्रभागांच्या चतु:सीमांची माहिती दिली. यावेळी २४ प्रभागांतून ४८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यात ५० टक्के आरक्षण असल्याने महिलांची संख्या देखील पुरुषांच्या बरोबरीने असेल. मतदारांच्या संख्येनुसार अनुसूचित जाती प्रवर्गाच्या जागेसाठी २, ८, १६, १८ या प्रभागांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. प्रभाग २ आणि ८ हे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले, तर उर्वरित दोन प्रभाग हे अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गासाठी राहिले. २४ क्र मांक प्रभागातील १ जागा एसटीसाठी तर ओबीसीसाठी १, ३, ४, ५, ६ , ७, १०, ११, १७, १९, २०, २२, २३ हे १३ प्रभाग आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यातील १, ४, ५, ६, १७, १९, २० हे ७ प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. महिला खुल्या प्रवर्गासाठी ३, ७, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १८, २१, २२, २३, २४ या प्रभागांतील एक एक जागा आरक्षित आहे, तर १, २, ४, ५, ६, ८, ९, १२, १३, १४, १५, १७, १९, २० या प्रभागांतील एक एक जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे.नियोजित पनवेल महानगरपालिका स्थापनेचे वारे सर्वत्र वाहत आहेत. यासंदर्भात नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. काही दिवसांतच त्याच्यावर सुनावणी अपेक्षित असताना पनवेल नगर परिषदेच्या प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक जण संभ्रमात आहेत. नियोजित पनवेल महानगरपालिका स्थापन होणार आहे कह नाही, अशी चर्चा सध्या सुरू आहे. उरण नगर परिषदेच्या निवडणुक ांचे आरक्षण जाहीरयेत्या डिसेंबर २०१६ रोजी होऊ घातलेल्या उरण नगर परिषदेच्या नऊ प्रभागांच्या १८ जागांचे आरक्षण शनिवारी जाहीर झाले. उरण नगर परिषदेच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी समीर कुर्तकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात आले. या प्रसंगी उरण तहसीलदार कल्पना गोडे, उरण नगराध्यक्ष महेश बालदी, उपनगराध्यक्ष सुजाता गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पिंपळे उपस्थित होते. सोडतीने काढण्यात आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे - प्रभाग १ अ सर्वसाधारण स्त्री, ब सर्वसाधारण, प्रभाग २ अ सर्वसाधारण स्त्री, ब सर्वसाधारण, प्रभाग ३ अ नागरिकांचा मार्गास प्रवर्ग स्त्री, ब सर्वसाधारण, प्रभाग ४ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ५ अ सर्वसाधारण स्त्री, ब सर्वसाधारण, प्रभाग ६ अ अनुसूचित जाती स्त्री, ब सर्वसाधारण, प्रभाग ७ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, ब सर्वसाधारण, प्रभाग ८ अ, प्रभाग क्र १ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण स्त्री व प्रभाग ९ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, ब सर्वसाधारण.