शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीतील अ‍ॅम्युझमेंट पार्कची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 02:52 IST

सुटीच्या दिवसात मुलांची गैरसोय : वर्षाच्या आतच खेळण्यांची मोडतोड

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने कोपरी येथे उभारण्यात आलेल्या अ‍ॅम्युझमेंट पार्कची उद्घाटनानंतर अवघ्या वर्षभरात दयनीय अवस्था झाली आहे. अनेक खेळणी तुटली असून काही खेळण्यांचे लोखंडी भाग तुटून लटकत आहेत. यामुळे सदर उद्यान खेळासाठी बंद असून ऐन सुटीच्या दिवसात परिसरातील मुलांची गैरसोय होत आहे.पालिकेच्या वतीने कोपरी येथे आकर्षक अ‍ॅम्युझमेंट पार्क उभारण्यात आले आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. मात्र उद्घाटनापासून हे उद्यान स्थानिकांच्या गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे उद्यानाच्या कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. सुरवातीला उद्यानात पाण्याची, तसेच विजेची समस्या भेडसावत होती. अशातच काही महिन्यांपासून उद्यानातील लहान मुलांची खेळणी तुटल्याने त्यांचा वापर बंद करण्यात आलेला आहे, तर विद्युत दिव्याची कामे अद्यापही सुरूच आहेत. यामुळे परिसरात उद्यान असूनही लहान मुलांसह नागरिकांना ते उपयोगी ठरत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून नादुरुस्त स्थितीतली ही खेळणी कधी दुरुस्त होतील याकडे मुलांचे लक्ष लागले आहे. तर नादुरुस्त खेळण्यावर एखादे लहान मूल चढल्यास त्याला दुखापत होण्याची दाट शक्यता आहे.नवी मुंबई महापालिका हे उद्यानांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. प्रत्येक विभागात एकापेक्षा जास्त चांगली उद्याने व पार्क पालिकेने उभारले आहेत. मात्र त्याची योग्य निगा राखली जात नसल्याने साहित्य मोडकळीस येत आहेत. उन्हाळ्याची सुटी म्हटले की लहान मुलांची मौजमजा असते. परंतु कोपरी परिसरातील मुलांची यंदाचीही सुटी उद्यानातील गैरसोयीमुळे निरुपयोगी ठरत आहे. उद्यानाच्या उद्घाटनानंतर अवघ्या काहीच महिन्यात उद्यानाची दयनीय अवस्था असल्याने तिथल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर अद्यापही बरीच कामे सुरू असल्याने पालिकेने वर्षभरापूर्वीच अपूर्ण उद्यानाच्या उद्घाटनाचा घाट का घातला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. हीच परिस्थिती शहरातल्या इतरही ठिकाणच्या उद्यानांची आहे.

टॅग्स :entertainmentकरमणूक