शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतीबरोबरच मत्स्य पालन पूरक व्यवसाय ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:22 IST

टी. एस. देशमुख : मुरुडमध्ये शेतकऱ्यांसाठी मत्स्य शेतीचा अभ्यास दौरा

मुरुड : कोकणातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात भात उत्पादन घेत असतात. खूप मेहनत घेऊनसुद्धा भात पिकांमधून मोठा फायदा होत नाही. यासाठीच शेतीबरोबर मत्स्यशेती हा पूरक व्यवसाय शेतकऱ्यांनी अवलंबून त्यातील तंत्र जाणून घेऊन आपल्या शेतातसुद्धा मत्स्यशेती विकसित करावी, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन किसान क्रांती संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष टी. एस. देशमुख यांनी केले आहे. मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीबरोबरच मत्स्यशेती विकसित करता यावी, यासाठी मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य मुरूड कार्यकारिणी  ३५ शेतकऱ्यांना  शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्य पालन, शेत तलाव यांची माहिती व अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.  पेण तालुक्यातील सचिन पाटील  या मत्स्यपालन करणाऱ्या शेतकरी यांच्या तलावास  भेट देण्यात आली. यांच्या तलावामध्ये  तिलापिया, रोहु, मिरग अशा अनेक संकरित मत्स्यची सविस्तर व प्रत्यक्ष माहिती त्यांनी शेतकरी मित्रांना दिली. त्यांना मत्स्य शेतीमधून दरवर्षी ६ लाख ते ७ लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कोलाड गोवे  परिसरातील  मत्स्य तज्ज्ञ हसन म्हसलानी  येथील मत्स्य बीज केंद्राला भेट दिली. येथे  तिलापिया, रोहु, मिरग व शोभिवंत मत्स्य बीजचे पैदास तलाव यांची  सविस्तर माहिती हसन म्हसलानी यांनी देऊन सर्व प्रकारच्या संकरित मत्स्य बीज उपलब्ध होतील, असे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांच्या मत्स्य पालनाबद्दलच्या ज्ञानात चांगली भर पडली आहे. येथून या अभ्यास दौऱ्यात स्थानिक  शेतकऱ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून मत्स्य शेतीविषयी विशेष माहिती सांगितल्याबद्दल  वरील सर्व  मार्गदर्शकांना किसान क्रांती  संघटनेच्यावतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. 

या मत्स्य पालन दौऱ्याचे नेतृत्व संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष  श्रीधर जंजिरकर यांनी केले होते. महाराष्ट्र अध्यक्ष  टी. एस. देशमुख यांनीसुद्धा बहुमूल्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे.  या अभ्यास दौऱ्यात  रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष मनोज कमाने, तालुका उपाध्यक्ष लीलाधर गोंयजी, तालुकाप्रमुख संतोष दांडेकर, संघटक दिलीप विरकुड, गजानन भोईर, अनिल नाकती, शैलेश गुंड, मुशर्रफ खतिब, अमेय वडके असे मुरूड तालुक्यातील एकूण ३५ जणांनी अभ्यास दौऱ्याचा लाभ घेतला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई