शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

शौचालय अनुदान वाटपात भ्रष्टाचार, शेकाप नगरसेवकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 23:49 IST

पालिकेच्यामार्फत बांधण्यात आलेल्या ४३४९ खासगी शौचालयाच्या अनुदान वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बुधवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला.

पनवेल : पालिकेच्यामार्फत बांधण्यात आलेल्या ४३४९ खासगी शौचालयाच्या अनुदान वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बुधवारी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला. याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल दहा दिवसात सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पालिकेच्या मार्फत वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांना वीस हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येते. परंतु हे अनुदान वाटप करताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला आहे. पंचायत समितीमार्फत अनुदान मिळालेल्या लाभार्थ्यांचा समावेश महापालिकेच्या लाभार्थी यादीत करण्यात आल्याची बाब नगरसेवक म्हात्रे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनीसुध्दा या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांनी दिले. त्यासाठी चारही प्रभागात ८0 जणांचे चौकशी पथक तैनात केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.महापालिकेच्या होर्डिंग धोरणावर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. या धोरणांअंतर्गत खाजगी इमारतीवर जाहिरात होर्र्डिंग उभारणे खर्चिक होणार आहे. महापालिका क्षेत्रात सध्याच्या घडीला ४९ अधिकृत होर्र्डिंग्स आहेत, तर ४0 ते ५0 अनधिकृत होर्डिंग असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. कळंबोली वसाहतीत मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांनी थैमान घातले असल्याची बाब राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. कळंबोलीजवळील खिडूकपाडा गावात देखील कॉलरा, कावीळ, डेंग्यूसारख्या साथीच्या रोगांची साथ पसरली आहे. अपूर्र्ण नालेसफाईमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे सतीश पाटील यांनी स्पष्ट केले.>पालिका बसविणार अत्याधुनिक ५0 टॉयलेट कंटेनरमहापालिका आपल्या कार्यक्षेत्रासाठी नवीन ५0 अत्याधुनिक टॉयलेट कंटेनर खरेदी करणार आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजे आदी भागात सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी आहे. अशा ठिकाणी हे कंटेनर टॉयलेट बसविले जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी सभागृहात दिली.>जिल्हा परिषदेच्या २0 शाळा धोकादायकपनवेल महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा आहेत. यापैकी २0 शाळांच्या इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या शाळेतून शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे. महापालिकेने तत्काळ जिल्हा परिषदेला यासंदर्भात सूचना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक जगदीश गायकवाड यांनी केली.