शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

पालिकेच्या आरक्षण सोडतीवर पक्षपातीपणाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 02:24 IST

अधिकाऱ्यांवर संगनमताचा ठपका; सेना पदाधिकारी न्यायालयात

नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी फेब्रुवारी २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेले प्रभागांचे आरक्षण पक्षपातीपणे केल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी आयुक्तांसह निवडणूक विभागाचीही दिशाभूल केली असून, राजकीय दबावाखाली सोडत काढली असल्याचा आरोप केला आहे. या सोडतीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.     नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २०२० मध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. निवडणूक विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे १ फेब्रुवारी रोजी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते. या आरक्षणाविषयी अनेक नगरसेवकांनी आक्षेप घेतले होते. शिवसेना नगरसेवक एम.के. मढवी व विनया मढवी यांनी न्यायालयात धाव घेतली होती; परंतु यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. निवडणूक विभागाने पुन्हा निवडणुकांसाठीची कार्यवाही सुरु केली असून, १६ फेब्रुवारीला प्रारूप मतदान यादी जाहीर करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मढवी दाम्पत्याने पत्रकार परिषद घेऊन आरक्षण सोडतीवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. एम.के. मढवी यांनी सांगितले की, तत्कालीन उपआयुक्तांनी ठरावीक राजकीय पक्षाला लाभ मिळेल, अशा पद्धतीने प्रभागांचे आरक्षण काढले आहे. महानगरपालिकेमध्ये अभ्यासपूर्ण बोलणाऱ्या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित केले आहेत. आरक्षणासाठी वापरण्यात आलेली पद्धत चुकीची आहे. मनपाची सहावी निवडणूक असताना ती चौथी असल्याचे भासविण्यात आले. २००५ च्या धर्तीवर  आरक्षण ठरविण्यात आले.  आरक्षण प्रक्रियेत असलेल्या उपआयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी संगनमताने ठरावीक राजकीय पक्षाला लाभ मिळूवन देण्यासाठी काम केल्याचा आरोपही केला. आयुक्त व निवडणूक विभागाचीही दिशाभूल केली आहे. आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारूप मतदान याद्या जाहीर करण्याची तारीख जवळ आली असताना आरक्षणावर आक्षेप घेतल्यामुळे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महानगरपालिकेसाठीचे प्रभाग आरक्षण सर्वसाधारण प्रभाग : १, ६, १३, १५, २४, ३४, ३६, ३७, ३८, ३९, ४४, ४५, ४७, ५१, ५२, ५३, ५६, ६२, ६३, ६९, ७०, ७१, ७२, ७३, ७६, ७८, ७९, ८०, ८५, ८७, ८८, ९०, ९४, ९६सर्वसाधारण महिला : ४, ५, ११, १४, १८, २२, २३, २६, २८, २९, ४०, ४२, ४६, ४९, ५०, ५५, ५७, ५८, ५९, ६०, ६१, ६७, ६८, ७४, ७५, ८४, ८९, ९२, ९३, ९५, ९७, १०३, १०७, १०९, ११०ओबीसी : २, ३३, ३५, ४१, ४३, ५४, ६४, ६५, ६६, ७७, ८३, ८६, ९१, ९८, ९९ओबीसी महिला : ७,८,९,१२,१९, २०, २१, २७, ८१, ८२, १००, १०२, १०४, १०५, १११अनुसूचित जाती महिला प्रवर्ग : १६, ३०, ३२, १०६, १०८अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग : २५अनुसूचित जाती प्रवर्ग : ३, १०, १७, ४८, १०१अनुसूचित जमाती पुरूष प्रवर्ग : ३१महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करताना अनेक उणिवा राहिलेल्या आहेत. पक्षपातीपणे आरक्षण ठरविण्यात आले असून, या सोडतीला आम्ही न्यायालयात आव्हान दिले आहे.- एम. के. मढवी, माजी नगरसेवक शिवसेनाकाय होणार याविषयी उत्सुकतामहानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीला आव्हान दिल्यामुळे आता मतदार याद्यांची प्रक्रिया पूर्ण होणार, का निवडणुका एप्रिलमध्ये होणार, की पुढे ढकलण्यात येणार याविषयी उत्सुकता लागली आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका