शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रीची दुकाने होणार पुन्हा सुरू, पनवेलमध्ये जवळपास १०० दुकाने : महापालिका, नगरपंचायत क्षेत्र वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 03:23 IST

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यानुसार महामार्गावरील हजारो बार काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले होते.

पनवेल : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावरील मद्यविक्री बंद करण्यात आली होती. त्यानुसार महामार्गावरील हजारो बार काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आले होते. पनवेल शहरात देखील शेकडो बार, बीयर शॉपी, वाइन शॉप या निर्णयामुळे बंद झाले होते. काहींनी तर आपली दुकाने इतरत्र सुरू केली होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील महामार्गावर दारूबंदी लागू होणार नसल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील शेकडो बार पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. दारूबंदी उठल्याने दुकानदार, तसेच मद्यपींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बार, शॉप हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पनवेल परिसरातील १०० हून अधिक परवाने रद्द करण्यात आले होते. मात्र या निर्णयात आता पुन्हा बदल करण्यात आल्याने बंद झालेले महानगरपालिका क्षेत्रातील वाइन बार, शॉप पुन्हा सुरू होणार आहे.राष्ट्रीय व राज्य मार्गावरील ५०० मीटर क्षेत्रात असलेल्या वाइन बार, वाइन शॉप, बीअर शॉपी हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे १ एप्रिलपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइन बार, शॉप, देशी दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पनवेलमधील अनेक वाइन बार, शॉप, बीअर शॉपी, देशी दारूची दुकाने बंद झाली, तर काहींनी राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर क्षेत्राबाहेर ही दुकाने हलविली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लिकर लॉबीला दिलासा मिळाला असून महापालिका क्षेत्रातील जवळपास ११0 वाइन बार, शॉप, बीअर शॉपी सुरू होणार आहेत.