शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ऑलकार्गो कामगारांचा आत्मदहनाचा इशारा, उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 02:55 IST

कामावरून केले कमी : उपासमारीची वेळ

उरण : तालुक्यातील कोप्रोली येथील आॅलकार्गो गोदाम कंपनीने २१ कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता गुरुवारी कामावरून काढून टाकले. या कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असून संतप्त कामगारांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणी उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे व उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदनही देण्यात आले आहे.आॅलकार्गो गोदामात सुरुवातीपासून हे कामगार काम करीत आहेत. प्रकल्पासाठी त्यांनी अत्यल्प दराने देऊ केल्या असून कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल, असे लेखी पत्र देण्यात आले असताना गुरुवारी अचानक कामावरून काढून टाकल्याचे व कामगारांच्या बँक खात्यावर नोकरीतील रक्कम आर्टिजीएसद्वारे सक्तीने टाकण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कंपनीत प्रवेशद्वाराजवळ कामावर येण्यास मज्जाव केलेल्या कामगारांच्या नावाची यादी लावण्यात आली आहे. सर्व कामगार वय ४० ते ४५ वयोगटातील असून आता दुसरीकडे रोजगार मिळले की नाही, याची चिंता त्यांना सतावत आहे. कुटुंबावर उपासमारीचे वेळ आल्याने सामुदायिक आत्मदहनाचा इशारा कामागारांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या प्रकरणी आॅलकार्गो गोदाम कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारीच हे जबाबदार राहतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.आॅलकार्गो गोदाम कंपनीने २७ जून २०१७ मध्ये सुमारे १३१ कामगारांना कमी केले. याबाबत जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. त्याचप्रमाणे २१ कामगारांनाही गुरुवारी गोदामात प्रवेश करण्याचा मज्जाव करण्यात आला. कामगारांनी आक्रमक भूमिका घेऊ नये यासाठी व्यवस्थापनाने प्रवेशद्वारासमोर मोठा पोलीस ताफा तैनात केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई