शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या जागेचा मोबदला नाही!

By admin | Updated: May 13, 2016 02:41 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता शासकीय जमीन सिडकोने आधीच हस्तांतरित केली आहे. याशिवाय पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या कोपर येथील

प्रशांत शेडगे, पनवेलनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता शासकीय जमीन सिडकोने आधीच हस्तांतरित केली आहे. याशिवाय पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या कोपर येथील जमिनीचा सातबारासुध्दा सिडकोच्या नावावर झाला आहे. मात्र त्या बदल्यात पालिकेला अद्याप सिडकोने जमीन दिली नसून याबाबत प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे जमीन तुम्ही घेतली, त्याचा पालिकेला मोबदला देणार कधी, असा सवाल लोकप्रतिनिधी विचारू लागले आहेत. पनवेलजवळील १४ गावांजवळ २०५६ हेक्टर जागेवर विमानतळ उभारण्यात येणार असून सिडको आणि शासनाची जागा विमानतळाकरिता याआधीच वर्ग करण्यात आली आहे. त्यानंतरही ४५० हेक्टर जागेचे संपादन करण्याचे काम बाकी होते. वाघिवली, गणेशपुरी, कोंबडभुजे, तरघर, उलवे, वरचा ओवळे, वाघिवली पाडा, कोल्ही, कोपर आणि चिंचपाडा हे दहा पाडे बाधित होणार असून यामुळे ३ हजार कुटुंबे विस्थापित होणार आहे. सिडकोला आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याकरिता नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे सिडकोने डिसेंबर २०१० सालीच पुनर्वसन पॅकेज जाहीर केले आहे. त्याचबरोबर बाधित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी संमतीपत्र भरून दिले आहेत. त्याचबरोबर कोपर येथे पनवेल नगरपालिकेने १९६० साली गटार योजनेकरिता ३२ एकर जागा संपादित केली होती. या ठिकाणी योजना काही प्रमाणात उभारण्यातही आली होती मात्र ती जास्त काळ चालू शकली नाही. त्यामुळे ही जमीन मिळावी याकरिता सिडको गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. सिडकोने या अगोदर पनवेल नगरपालिकेभोवती मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केली. पालिकेची हद्द असलेले नवीनपनवेल, खांदा वसाहतही महामंडळाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे पालिकेकडे आता जागाच शिल्लक राहिलेली नाही या कारणाने विकासकामे, योजना राबविण्याकरिता अडथळे निर्माण होत आहेत. पनवेल शहर त्याचबरोबर सिडकोच्या जागेत असलेल्या झोपडपट्ट्या हटविण्याकरिता त्याचे पुनर्वसन करणे क्र मप्राप्त आहे. याची पूर्णत: जबाबदारी पनवेल नगरपालिका घेत असून फक्त जागा सिडकोने द्यायची आहे. त्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. बायोमेट्रिक सर्व्हे करून अहवाल तयार करण्यात आलेला आहे. मात्र सिडकोकडून अद्यापही जागा पालिकेकडे हस्तांतरित केली नाही. तक्का येथे भूखंड याकरिता सिडकोने फक्त देवू केला आहे, प्रत्यक्षात कृती शून्य आहे. या संदर्भात वारंवार बैठका झाल्या मात्र सिडकोकडून फक्त आश्वासनाची खैरात करण्यात आली. त्यामुळे कोपर येथे जागा देण्यास पालिकेने सातत्याने विरोध दर्शवला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात आदेश पारित करीत ही जागा विमानतळाकरिता देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. मात्र हा आदेश देत असताना त्या बदल्यात दुसरीकडे जमीन उपलब्ध करून देण्याचा उल्लेख होता. परंतु सिडकोने या आदेशाला हरताळ फासला असून चालढकलपणा सुरू आहे.