शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ प्रकल्पाची गती मंदावणार!

By admin | Updated: August 10, 2016 03:34 IST

देशाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प एकहाती हाताळणाऱ्या सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांची उत्पादन शुल्क विभागाच्या

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई देशाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प एकहाती हाताळणाऱ्या सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांची उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीमुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची गती मंदावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.व्ही.राधा यांचा सिडकोतील कार्यकाळ २२ मे रोजी संपुष्टात आला. आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात राधा यांनी सकारात्मक कामावर भर दिला. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील विविध अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी विविधस्तरावर प्रयत्न केले. भूसंपादनाला विरोध करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांशी सुंसवाद साधला. या प्रकल्पाच्या दृष्टीने त्यांचे मन वळविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले. त्यासाठी गावोगावी जावून बैठका घेतल्या. महिलांशी चर्चा केली. विमानतळबाधितांना देवू केलेल्या पुनर्वसन पॅकेजसंदर्भात त्यांचे प्रबोधन केले. इतकेच नव्हे, तर प्रकल्पग्रस्त महिला आणि त्यांच्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कोर्सेस सुरू केले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भूसंपादनाच्या कामात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. भूसंपादनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना सकारात्मक करण्यासाठी त्यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची मानली जाते. सध्या विमानतळ प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असले तरी प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न शिल्लक आहेत. गावांच्या स्थलांतराला त्यांचा विरोध आहे. संपादित जमिनीच्या बदल्यात पुष्पकनगरमध्ये देण्यात येत असलेल्या भूखंडाचे करारपत्र घ्यायलाही प्रकल्पग्रस्तांकडून फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे सिडकोचे प्रयास सुरू असतानाच व्ही. राधा यांची बदली झाल्याने त्याचा फटका या प्रकल्पाच्या कामाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.