शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत वायुगळती; घरगुती गॅसपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:43 IST

महापालिकेचे काम सुरू असताना लाइन फुटल्याचा प्रकार

नवी मुंबई :  महापालिकेच्या वतीने वाशीमध्ये सांडपाणी वाहून जाणाऱ्या ड्रेनेजसाठी कनर्व्हटचे काम सुरू असताना महानगर कंपनीची घरगुती गॅसची पाइपलाइन फुटून गुरुवारी दुपारी गॅसगळती झाली होती. या वेळी वाशी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅसगळतीवर नियंत्रण मिळविले.

वाशी परिसरात इमारतींना गॅसपुरवठा करणारी ही मुख्य गॅस पाइपलाइन फुटल्याने गॅसचे मोठे फवारे हवेत उडत होते. यामुळे आजूबाजूची दुकाने बंद करीत वाहतूक थांबविण्यात आली होती. गळतीमुळे वाशी विभागातील सेक्टर ६, ७, ८, ९, १०, १४ आणि १६ परिसरातील महानगर गॅसच्या ग्राहकांची सेवा थांबविण्यात आली होती.

दुपारी वायुगळती झाल्यानंतर काही मिनिटांतच महानगर गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाइपलाइनचा व्हॉल्व बंद केला. महानगर कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तत्काळ वायुगळती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वाशी अग्निशमन दलाने गॅसगळतीवर नियंत्रण मिळविले.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वाशी फायर स्टेशन वाहतूक सिग्नलसमोरील रस्त्यालगत पावसाळी पाणी बाहेर जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने ड्रेनेजसाठी कनर्व्हटसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना वायुगळती झाल्याचे निदर्शनास आले.- अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता, वाशी

वाशी जैन मंदिराजवळ वायुगळती झाल्याचे निदर्शनास येताच अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षेसाठी त्वरित सभोवताली अडथळे उभे करून आजूबाजूची दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. महानगर गॅस कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे गळतीवर नियंत्रण मिळविले.- पी. व्ही. जाधव, विभागीय अग्निशमन अधिकारी, वाशी.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई