शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत हस्तांतरणापूर्वी हवा न्याय

By admin | Updated: January 2, 2017 06:25 IST

सिडकोकडून विकसित करण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी नवीन पनवेल व पोदीमधील नागरिकांच्या जमिनी घेण्यात आल्या. मात्र यावेळी प्रकल्पग्रस्तांना दिलेले आश्वासन सिडकोने पाळले नाही

नितीन देशमुख, पनवेलसिडकोकडून विकसित करण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी नवीन पनवेल व पोदीमधील नागरिकांच्या जमिनी घेण्यात आल्या. मात्र यावेळी प्रकल्पग्रस्तांना दिलेले आश्वासन सिडकोने पाळले नाही. आता हा भाग पनवेल महापालिकेत समाविष्ट करीत सिडकोने आपली जबाबदारी झटकल्याने याठिकाणी तीन पिढ्यांपासून राहणाऱ्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सिडकोच्या हुकूमशाहीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ९५ वर्षीय गंगाराम कुदळे यांनी केली आहे.नवीन पनवेलमधील पोदी व खांदा हा विभाग १९६४ पासून पनवेल नगरपरिषदेत सामील करण्यात आला. तेव्हापासून नगरपरिषद येथील रहिवाशांकडून कर वसूल करीत आहे. १९७१ मध्ये सरकारने पनवेल नगरपरिषदेच्या या वाढवलेल्या हद्दीचा विकास करण्यासाठी सिडकोची नियुक्ती केली. कोणताही विरोध न करता पोदी विभागातील ३०० एकर जमीन स्थानिकांनी सिडकोला दिली. या जमिनी व्यावसायिकांना देऊन सिडकोने नफा मिळवला. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना दिलेले आश्वासन मात्र पाळण्यात आले नाही. तब्बल ४६ वर्षे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींची चर्चा सुरू आहे. सिडकोने पोदी गावाला गावठाण विस्तार योजना लागू केली नाही. २०० ते २५० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या घरांवर व सातबाऱ्यावर नोटीस न देता संपादनाचे शिक्के मारले. प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के भूखंड वितरित केले नाही. शिवाय ज्यांना भूखंड वितरित करण्यात आले तेथे रस्ते, पाणी कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत.शेतकऱ्यांना व बेरोजगार झालेल्या गावकामगारांना नियमाप्रमाणे ४० मीटरचे भूखंड दिलेले नाहीत. कुटुंब वाढल्याने गरजेपोटी २०० मीटरच्या आत बांधलेल्या घरांना राज्यसरकारच्या नगरविकास खात्याच्या २२ जानेवारी २०१० च्या अध्यादेशाप्रमाणे नियमित करणे गरजेचे होते. पण सिडकोने त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले. १ आॅक्टोबर २०१६ पासून पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आली असून यात या भागांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र सिडकोने येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न न सोडवताच हस्तांतरणाचा निर्णय घेतल्याने गरजेपोटी बांधलेल्या घरांवर टांगती तलवार आहे.