शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सिडको विरोधातील जासईतील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 22:05 IST

गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद पडल्याने खारकोपर -उरण १४.३ किमी लांबीचा दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम आणखीनच रखडणार ! 

मधुकर ठाकूर

उरण : खारकोपर -उरण १४.३ कि.मी.लांबीचा रेल्वे मार्गाचे काम मागील काही दिवसांपासून रखडले आहे. सिडकोने  संपादन केलेल्या जमिनीचा मोबदला, भुखंड वाटप देण्यास दिरंगाई केल्याने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम       प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्याने बंद पडले आहे.आधी आश्वासनांची पूर्तता त्यानंतरच काम अशी ठाम भूमिका जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतली असल्याची माहिती सरपंच संतोष घरत यांनी दिली. 

  सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.त्यानंतर उर्वरित गव्हाण,रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेशन उभारणी, रेल्वे ट्रॅक टाकणे, ओव्हरहेड वायर, उड्डाण पूल उभारण्याची कामे प्रगतीपथावर आहेत.या प्रगतीपथावरील कामांच्या जोरावरच रेल्वे प्रशासनाने सप्टेंबर २०२२ प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन दिली होती.मात्र वारंवार दिलेल्या हेडलाईन्स पाळण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता नव्याने २०२३ म्हणजे पुढील वर्षाची डेडलाईनजाहीर केली आहे. मात्र खारकोपर-उरण या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम जोरदार सुरू असतानाच जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाच्या कामालाच विरोध करत अडथळा निर्माण केला आहे.आधी सिडकोने आश्वासन दिल्याप्रमाणे ३२ शेतकऱ्यांना भुखंडाचे वाटप , मोबदला द्या त्यानंतरच काम सुरू करा.अशी कठोर भूमिका जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतली असल्याची माहिती सरपंच संतोष घरत यांनी दिली.शेतकऱ्यांच्या सिडकोच्या विरोधातील संतप्त भुमिकेमुळे गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम काही दिवसांपासून ठप्प पडले आहे. परिणामी खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम आणखीनच रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यामुळे मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या उरणकरांना  नेरुळ - उरण  रेल्वे मार्गावर रेल्वे धावण्याची आणखी वाट पहावी लागते की काय अशीही भीती उरणकरांना लागुन राहिली  आहे.