शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सात जणांच्या मृत्यूनंतर जुई पुलाचे दुरुस्तीकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:38 IST

सायन-पनवेल मार्गावरील जुई पुलाचे दुरुस्तीकाम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. गत आठवड्यात एकाचा बळी गेल्यानंतर गुन्हा दाखल होताच विभागाला जाग आली आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावरील जुई पुलाचे दुरुस्तीकाम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. गत आठवड्यात एकाचा बळी गेल्यानंतर गुन्हा दाखल होताच विभागाला जाग आली आहे. यामुळे सदर ठिकाणी दुचाकींच्या अपघातांना भविष्यात आळा बसणार आहे.सायन-पनवेल मार्गावर सानपाडा ते वाशी दरम्यानच्या जुई पुलाचा काही वर्षांपूर्वी विस्तार करण्यात आला आहे. मात्र या विस्ताराच्या कामादरम्यान पुलाचा नवा व जुना भाग जोडण्यासाठी लोखंडी रॉडचा वापर करण्यात आलेला आहे. परंतु कामातील त्रुटीमुळे दोन रॉडमध्ये समान उंची नसल्याने त्याठिकाणी दुचाकींचे अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी २०१६ पासून पोलीस प्रयत्न करत आहेत. परंतु वाशी शहर व वाहतूक पोलिसांकडून अनेकदा पत्रव्यवहार करून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत होते. यामुळे तीन वर्षात त्याठिकाणी शेकडोच्या वर छोटे-मोठे अपघात झाले असून त्यात सात जणांचा बळी गेला आहे. वाशीच्या दिशेने जाणारी दुचाकी दोन रुळातील अंतरामुळे घसरून हे अपघात घडत आहेत. त्यामुळे पुलाची दुरुस्ती तत्काळ व्हावी अशी नागरिकांची मागणी होती. याचदरम्यान १० मार्च रोजी दुपारी पुन्हा एकदा झालेल्या अपघातामध्ये एकाचा प्राण गेला. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल होताच खडबडून झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तिथले दुरुस्तीकाम हाती घेतले आहे. उशिरा का होईना, परंतु पी.डब्ल्यू.डी. विभागाला जाग आल्याचे समाधान पोलिसांनी व्यक्त केले आहे.>जुई पुलाचा जुना व नवीन भाग जोडण्यासाठी सुमारे ७० ते ८० मिटर लांबीचा लोखंडी रॉड वापरण्यात आलेला आहे. या दोन्ही रॉडमध्ये फट राहिली असून सुमारे चार ते पाच इंच उंचीचाही फरक आहे. या फरकामुळे त्याठिकाणी दुचाकींचे चाक घसरुण अपघात घडत होते. हे अपघात टाळण्यासाठी लोखंडी रॉडमधील अंतर सिमेंट अथवा डांबराने भरुन काढणे आवश्यक होते. परंतु सात बळी गेल्यानंतर प्रत्यक्षात हे काम मार्गी लागले आहे.