शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियान संपताच प्रसाधनगृहांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 02:25 IST

अभियानादरम्यान पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून शहरामध्ये नवीन प्रसाधनगृहे उभारली.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान संपताच शहरातील अनेक स्वच्छतागृहांच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सीवूड, बोनसरीसह अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांना टाळे लागले आहेत. यामुळे स्वच्छतेची चळवळ अभियानापुरतीच मर्यादित होती का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळाला. अभियानादरम्यान पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून शहरामध्ये नवीन प्रसाधनगृहे उभारली. जुन्या प्रसाधनगृहांची डागडुजी करण्यात आली. स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी ठेकेदारांची नियुक्तीही करण्यात आली होती. परंतु अभियान संपताच स्वच्छतेकडे दुर्लक्ष सुरू झाले आहे. सीवूडमधील एनएमएमटीच्या डेपोमध्ये नवीन प्रसाधनगृह उभे केले होते. अभियान सुरू असताना ते सुरू केले होते. अभियान संपताच त्याला टाळे लावले आहेत. आता पुढील वर्षी अभियानामध्येच पुन्हा ते सुरू करणार का असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. बोनसरी गावातील नाल्याच्या बाजूलाही अभियान काळात फिरते शौचालय बसविले होते. ते अद्याप सुरू झालेले नाही. शौचालयासाठी मल वाहून नेणारी वाहिनी टाकण्यात आलेली नाही. फक्त दिखाव्यापुरतीच सोय करण्यात आलेली आहे. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरही नवीन प्रसाधनगृह उभारले असून ते अद्याप सुरू केलेले नाही.प्रसाधनगृहांच्या देखभालीची स्थितीही बिकट आहे. सायन - पनवेल महामार्गावर वाशीजवळील प्रसाधनगृहामधील मलनि:सारणचे पाणी रोडवर येवू लागले आहे. प्रसाधनगृहाच्या बाजूला डबके तयार झाले असून दुर्गंधी पसरू लागली आहे. याठिकाणी चोवीस तास प्रवाशांची ये - जा असते. पण रात्री प्रसाधनगृह बंद ठेवले जात आहे.सारसोळे सेक्टर ६ व रामलीला मैदानाला लागून असलेल्या प्रसाधनगृहाचीही योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही. मुंबईकृषी उत्पन्न बाजार समितीच्याभाजी, धान्य मार्केटजवळील प्रसाधनगृहांची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान