नवी मुंबई : तंत्रशिक्षण परिषदेने 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता नाकारली आहे. त्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्याथ्र्याची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे. परंतु मान्यता रद्द झाल्याची बाब लपवून प्रवेश दिले जात असल्याने पालक व विद्याथ्र्याची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी सन 2क्14-15 या शैक्षणिक वर्षाकरिता 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 9 अभियांत्रिकी महाविद्यालये ही नवी मुंबई क्षेत्रतील आहेत. परंतु मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु अद्याप त्यासंबंधीचा अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी विद्याथ्र्याचे प्रवेश घेतल्यास ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन तात्पुरत्या स्वरुपाचे असतील असेही सूचित केले आहे. तर या प्रकारासंबंधीची माहिती विद्यार्थी व पालकांना देणो आवश्यक असल्याचेही सूचनेत म्हटले आहे. नेरूळ येथील एसआयईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, नवीन पनवेलचे पिल्लई, कोपरखैरणोतील इंदिरा गांधी आणि लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालय, ऐरोली येथील दत्ता मेघे यासह सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांचाही समावेश आहे. नवी मुंबईतील संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सर्रास प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. परंतु प्रवेश घेतलेल्या अनेक विद्याथ्र्याना त्या महाविद्यालयाची मान्यता रद्द झाल्याची माहिती देखील नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याच्या भवितव्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. भविष्यात न्यायालयाने देखील या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला तर या विद्याथ्र्याची मोठी शैक्षणिक हानी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मनविसेने लावले होर्डिग
मान्यता रद्द असतानाही विद्याथ्र्याचे प्रवेश घेतले जात असल्याने अशा विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अशा अभियांत्रिकी महाविद्यालयांबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने होर्डिग लावले आहेत. त्यावर तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आदेशाची प्रत प्रसिध्द करण्यात आली आहे. अनेक महाविद्यालयांनी विद्याथ्र्याची दिशाभूल करून प्रवेश प्रक्रिया राबवल्याचे मनविसेचे शहर अध्यक्ष शिरीष पाटील यांचे म्हणणो आहे. त्यामुळे विद्याथ्र्याचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित महाविद्यालयांबाहेर होर्डिग लावले असल्याचे पाटील यांनी सांगितले.